इंदौर IND vs AFG T20I : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळला जाणार आहे. इंदौरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघानं जिंकला होता. त्यामुळं अफगाणिस्तानसाठी हा सामना 'करो किंवा मरो' असाच असेल.
भारताचं पारडं जड : पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही भारतीय संघाचा वरचष्मा असल्याचं स्पष्टपणं दिसतंय. कारण आजपर्यंत अफगाणिस्तानचा संघ भारताला टी-20 सामन्यात पराभूत करु शकलेला नाही. भारत आणि अफगाणिस्तानचे संघ आतापर्यंत 6 वेळा आंतरराष्ट्रीय T20 मध्ये भिडले आहेत. यात अफगाण संघानं 5 सामने गमावले असून एक सामना अनिर्णित राहिलाय. इंदौरबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघानं इथं आतापर्यंत तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. इथं त्यांनी दोन सामने जिंकले आहेत. तर एक सामना गमावलाय.
विराट कोहलीची संघात वापसी : या सामन्यात भारतीय संघ आपल्या प्लेइंग इलेव्हन मध्ये काही बदल करु शकते. तिलक वर्माच्या जागी विराट कोहली संघात परतणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय. तसंच शुभमनच्या जागी यशस्वीला संधी मिळू शकते. गोलंदाजीत रवी बिश्नोईच्या जागी कुलदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये आणि मुकेशच्या जागी आवेशला स्थान मिळू शकतं. अफगाणिस्तान संघात काही बदल होण्याची शक्यता दिसत नाही.
- भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल/शुबमन गिल, विराट कोहली, शिवम दुबे, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव/रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान/मुकेश कुमार
- अफगाणिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), हजरतुल्ला झझई/रहमत शाह, इब्राहिम झादरान (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झादरान, करीम जन्नत, गुलबदीन नाइब, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, फझलहक फारुखी
हेही वाचा :
- इंदूरमध्ये दिसतो टीम इंडियाचा धाक, किती आहे सरासरी स्कोर; जाणून घ्या
- इंग्लंडविरुद्ध कसोटीसाठी भारतीय संघात 'ध्रुव'ची एंट्री, तर 'अर्जुन पुरस्कार' विजेता खेळाडू संघाबाहेर
- IND VS AFG 1ST T20 : भारताचा अफगाणिस्तानवर सहा विकेट्स राखून शानदार विजय; मालिकेत आघाडी