महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

World Cup 2023 IND vs BAN : सलग चौथ्या विजयासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया; मात्र सामन्यात येऊ शकतो पावसाचा व्यत्यय? - सलग चौथ्या विजयासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया

World Cup 2023 IND vs BAN : विश्वचषकात आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना रंगणार आहे. शाकिब अल हसन आणि रोहित शर्माचा संघ आज पुण्यात होणाऱ्या विश्वचषक २०२३ च्या १७व्या सामन्यात एकमेकांना कडवी टक्कर देताना दिसणार आहेत. एकदिवसीय विश्वचषकात या दोन संघांमध्ये पुन्हा एकदा लढत होणार आहे.

World Cup 2023 IND vs BAN
World Cup 2023 IND vs BAN

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 7:50 AM IST

पुणे World Cup 2023 IND vs BAN : यंदाच्या विश्वचषकातील 17 वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात आज पुण्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यंदाच्या विश्वचषकात सलग चौथ्या विजयाच्या इराद्यानं उतरणार आहे. तर बांगलादेश संघाला भारताचा पराभव करून पुन्हा एकदा मोठा उलटफेर करायचा आहे. आयसीसी क्रमवारीत भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा संघ आहे. आतापर्यंत विश्वचषकात भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा पराभव केलाय. विशेष म्हणजे 25 वर्षांनंतर घरच्या मैदानावर भारताचा बांगलादेश विरोधात सामना होणार आहे.

सामन्यात पावसाची शक्यता : पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या आजच्या सामन्यात पावसामुळं व्यत्यय येऊ शकतो. हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. मात्र, पुण्यात आज पावसाची शक्यता आहे. सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधीही येथं पाऊस पडला. अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याला तेज असं नाव देण्यात आलंय. या चक्रीवादळामुळं पुण्यातील हवामान बदललं आहे.

पुण्याच्या खेळपट्टीची स्थिती काय : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. इथं संपूर्ण सामन्यात धावा करणं खूप सोपं आहे. या खेळपट्टीवर सामान्य उसळी आणि वेग आहे. तसंच मोठे फटके सहज मारता येतात. मैदानही खूपच लहान आहे. त्यामुळं फिरकी गोलंदाजांविरुद्ध खूप धावा केल्या जातात. या मैदानावर सर्वोच्च धावसंख्या (356/2) भारतानं 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध केली होती. सर्वात कमी धावसंख्याही भारतानं 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (232 धावा) केली होती.

भारताचे महत्त्वाचे खेळाडू : भारतीय संघ बांगलादेश संघाला आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीनं हरविण्यासाठी तयार झाला आहे. बांगलादेशला रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली आणि के.एल. राहुल यांच्या फलंदाजीकडून धोका असेल. तर गोलंदाजीत बांगलादेशचे फलंदाज जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांच्याविरुद्ध लिटमस टेस्टला सामोरं जाणार आहेत.

बांगलादेशचे महत्त्वाचे खेळाडू : बांगलादेशची गोलंदाजी खूप मजबूत आहे. ती भारतीय फलंदाजांसाठी मोठा धोका ठरू शकते. शाकिब अल हसन, तस्किन अहमद, शेख मेहदी हसन, मेहदी हसन मिराज, शॉरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान हे संघात चमकदार गोलंदाजी करत आहेत. हे गोलंदाज भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. याशिवाय फलंदाजीत लिटन दास आणि शकीबकडून संघाला अधिक अपेक्षा असतील.

भारत-बांगलादेश हेड टू हेड : भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय विश्वचषकाचा इतिहास अतिशय रोमांचक राहिलाय. 2003 च्या विश्वचषकात बांगलादेश संघानं भारतीय संघाला पराभूत करून स्पर्धेतून बाहेर काढले होते. एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत हे दोन्ही संघ 4 वेळा आमनेसामने आले आहेत. यात भारतानं 3 वेळा विजय मिळवला आहे तर बांगलादेशनं फक्त एकदाच विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत या विश्वचषकात भारताचा वरचष्मा दिसत आहे.

  • एकदिवसीय सामने - 40
  • भारतानं जिंकलेले सामने - 31
  • बांगलादेश जिंकलेले विजयी - 8
  • अनिर्णीत सामने - 1

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : न्यूझीलंडनं अफगाणिस्तानला लोळवलं, १४९ धावांनी मोठा विजय
  2. Rohit Sharma : पंतच्या चुकीनंतरही रोहित सुधारला नाही, पुण्याच्या पोलिसांनी ठोठावला दंड
  3. Cricket World Cup 2023 NZ vs AFG : अफगाणिस्तानच्या 'फिरकी त्रिकूटाचं' न्यूझीलंडसमोर तगडं आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details