महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विश्वचषक हारला, पण आपल्या फलंदाजीनं जिंकलं सर्वांचं मन; विराट कोहली 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट'! - क्रिकेट विश्वचषक २०२३

Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला विश्वचषकातील त्याच्या शानदार कामगिरीनंतर 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. ही उपलब्धी मिळवणारा तो सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंगनंतर तिसरा भारतीय ठरला आहे.

Virat Kohli
Virat Kohli

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 10:46 PM IST

अहमदाबाद Virat Kohli :क्रिकेट विश्वचषक २०२३ चा शेवट झाला आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर ६ गडी राखून विजय मिळवला आणि सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं.

विराट कोहली 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट : या विश्वचषकात आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं अनेक रेकॉर्ड मोडणाऱ्या विराट कोहलीला 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यानं विश्वचषकाच्या ११ सामन्यात तब्बल ७६५ धावा ठोकल्या. या दरम्यान त्याची सरासरी ९५.६२ आणि स्ट्रईक रेट ९०.३१ एवढा राहिला. विश्वचषकात त्यानं बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध शतकं झळकावली. यासह विराट कोहलीनं एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. त्यानं या बाबतीत त्याचा आदर्श खेळाडू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. सचिननं २००३ च्या विश्वचषकात ६७३ धावा बनवल्या होत्या.

मोहम्मद शमीच्या नावे सर्वाधिक विकेट : अंतिम सामन्यात शानदार शतक ठोकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यानं १२० चेंडूत १३७ धावांची धडाकेबाज खेळी केली. भारताच्या मोहम्मद शमीनं या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेतल्या. त्यानं केवळ ७ सामन्यांमध्ये २४ बळी आपल्या नावे केले. या दरम्यान त्याची सरासरी १०.७१ एवढी राहिली.

विश्वचषकाच्या इतिहासातील 'मॅन ऑफ द टुर्नामेंट विजेते' :

  • १९९२ - मार्टिन क्रो (न्यूझीलंड)
  • १९९६: सनथ जयसूर्या (श्रीलंका)
  • १९९९ - लान्स क्लुसेनर (दक्षिण आफ्रिका)
  • २००३ - सचिन तेंडुलकर (भारत)
  • २००७ - ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)
  • २०११ - युवराज सिंग (भारत)
  • २०१५ - मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
  • २०१९ - केन विल्यमसन (न्यूझीलंड)
  • २०२२ - विराट कोहली (भारत)

हेही वाचा :

  1. करोडो भारतीयांचं स्वप्न भंगलं, ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा जगज्जेता; टीम इंडियाचा दारूण पराभव
  2. रोहित 'रेकॉर्डतोड' शर्मा! कर्णधार म्हणून आणखी एक विक्रम केला; जाणून घ्या
  3. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये घुसला पॅलेस्टाईन समर्थक, विराटला भेटायला गेला थेट खेळपट्टीवर

ABOUT THE AUTHOR

...view details