हैदराबाद Point Table World Cup 2023 : क्रिकेटचा महाकुंभ एकदिवसीय विश्वचषक २०२३ यंदा भारतात आयोजित करण्यात आलाय. 5 ऑक्टोबरपासून सुरू झालेली ही स्पर्धा 19 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या 46 दिवसांत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. काल ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात यंदाच्या विश्वचषकातील 10 वा सामना खेळला गेला. यात ऑस्ट्रेलियाला विश्वचषकातील सर्वात मोठा पराभव स्वीकारावा लागला. आतापर्यंत सर्व संघांनी 2-2 सामने खेळले आहेत. आतापर्यंत खेळलेले बहुतांश सामने हे रोमांचक झाले आहेत.
गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावर : विश्वचषकात आतापर्यंत झालेल्या 10 सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पॉइंट टेबलमधील टॉप-4 संघांबद्दल बोलायचे झाले तर या सर्वांनी आपले दोन्ही सामने जिंकले असून प्रत्येक संघाचे 4 गुण झाले आहेत. परंतु, निव्वळ रन रेटच्या आधारावर संघाची स्थिती वर आणि खाली झालीय. दक्षिण आफ्रिकेचा रन रेट +2.360 आहे त्यामुळं तो अव्वल स्थानावर आहे. तर न्यूझीलंड दुसऱ्या, भारत तिसऱ्या आणि पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रलिया नवव्या स्थानावर : पाच वेळचा विश्वविजेतचा संघ ऑस्ट्रलियानं यंदाच्या विश्वचषकात लौकीकाला साजेशी कामगिरी केली नाही. त्यांना पहिल्या सामन्यात भारताकडून तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून मोठा पराभव स्वीकारावा लागला. यामुळं त्यांची गुणतालिकेत नवव्या स्थानावर घसरण झाली आहे. जर आगामी सामन्यांत ऑस्ट्रलियानं विजय न मिळवल्यास स्पर्धेतून बाहेर होण्याची नामुष्की त्यांच्यावर येऊ शकते.