महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Mohammed Azharuddin : 'भारतच विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार', माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांची 'ईटीव्ही भारत'शी खास मुलाखत - विश्वचषक २०२३

Mohammed Azharuddin : १९९२, १९९६ आणि १९९९ च्या एकदिवसीय विश्वचषकांमध्ये भारताचं नेतृत्व करणारे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांना वाटतं की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील हा संघ विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. वाचा 'ईटीव्ही भारत'चे निखिल बापट यांचा खास रिपोर्ट.

Mohammed Azharuddin
Mohammed Azharuddin

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 7:06 PM IST

हैदराबाद Mohammed Azharuddin : कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील सध्याचा भारतीय क्रिकेट संघ हा विश्वचषक जिंकून २०१३ पासूनचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे, असं मत भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी व्यक्त केलं. ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अझरुद्दीन यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढला होता. ९९ कसोटी सामने खेळलेले अझहर हैदराबादच्या ज्युबली हिल्स मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

भारत साखळी फेरीत अपराजित राहिला : भारतीय संघ सध्या विजयी मार्गावर आहे. भारत हा एकमेव संघ आहे, जो विश्वचषकाच्या साखळी टप्प्यात अपराजित राहिला. चेन्नईतील चेपॉक येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहिमेची सुरुवात करणाऱ्या भारतानं गेल्या रविवारी बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर लीग टप्प्यातील अखेरचा सामना खेळला. टीम इंडियानं उपांत्य फेरीत टेबल टॉपर्स म्हणून धडाक्यात प्रवेश केला आहे.

सर्व खेळाडूंनी योगदान दिलं : ६० वर्षीय मोहम्मद अझरुद्दीन यांनी 'ईटीव्ही भारत'शी विशेष संभाषणात सांगितलं की, भारत एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. संघ चांगल्या प्रकारे खेळतो आहे. टीममध्ये संयोजन चांगलं आहे. संघाची फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण, सर्वच विभाग समन्वयानं खेळत आहेत. भारताच्या सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. संघाला गरज असताना ते उभे राहिले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या स्टार फलंदाजांव्यतिरिक्त, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव या युवा खेळाडूंनी वेळप्रसंगी आवश्यक योगदान दिलं. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील गोलंदाजी आक्रमण घातक ठरलं आहे, असं ते म्हणाले.

भारताचा सामना न्यूझीलंडशी : बुधवार, १५ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिल्या उपांत्य फेरीत मेन इन ब्लूचा सामना न्यूझीलंडशी होईल. हा विजय भारताला अंतिम फेरीत घेऊन जाणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुरुवारी होणार्‍या दुसऱ्या सेमी फायनलमधील विजेता संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल.

हेही वाचा :

  1. Pravin Amre : श्रेयस अय्यर भविष्यात टीम इंडियाचं नेतृत्व करू शकतो का? कोच प्रवीण आमरे यांनी ETV Bharat ला दिलं उत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details