महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Indian Cricket Team Diwali Celebration : भारतीय संघानं नेदरलॅंड्सविरुद्धच्या सामन्यापुर्वी आपल्या कुटुंबियांसोबत केली दिवाळी साजरी; पाहा व्हिडिओ - भारतीय कर्णधार रोहित शर्मा

Indian Cricket Team Diwali Celebration : भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी केली. आता त्यांना बंगळुरूमध्ये नेदरलँडविरुद्ध विजयाची आतषबाजी करायची आहे. दिवाळीच्या निमित्तानं बीसीसीआयनं एक व्हिडिओ शेअर केलाय. यात भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू दिवाळीच्या जल्लोषाची तयारी करत आहेत.

Indian Cricket Team Diwali Celebration
Indian Cricket Team Diwali Celebration

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2023, 11:45 AM IST

नवी दिल्ली Indian Cricket Team Diwali Celebration : भारतीय संघानं आयसीसी क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारलीय. आज संपूर्ण भारत त दिवाळी साजरा होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडूदेखील दिवाळी साजरी करत आहेत. भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंनी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली. याचा व्हिडिओ बीसीसीआयनं आपल्या अधिकृत हँडलवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पुर्वीचं ट्विटर) वर पोस्ट केलाय.

क्रिकेटपटूंनी कुटुंबासोबत दिवाळी केली साजरी : या व्हिडिओत भारतीय संघाचे खेळाडू त्यांच्या कुटुंबियांसोबत दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला हॅप्पी दिवाळीचा बोर्ड दाखवलाय. त्यानंतर खेळाडू त्यांच्या कुटुंबियांसोबत दिसत आहेत. या व्हिडिओत भारतीय कर्णधार रोहित शर्मा दिसत आहे. रोहित त्याची पत्नी रितिका आणि मुलीसोबत दिसत आहे. या व्हिडिओत विराट कोहली त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत दिसत आहे. तर रवींद्र जडेजाही त्याची पत्नी आमदार रिवाबा जडेजासोबत दिसत आहे. या दिवाळी कार्यक्रमात खेळाडूंसाठी खाद्यपदार्थही उपलब्ध आहेत.

इशाननं शार्दुल आणि गिलसोबत केली मस्ती : या व्हिडीओत भारतीय संघाचा यष्टिरक्षक ईशान किशन आनंद साजरा करताना दिसत आहे. तो शार्दुल ठाकूर आणि शुभमन गिलला काहीतरी बोलताना दिसत आहे. गिल आणि शार्दुलनं एकाच रंगाचा कुर्ता घातलाय, ज्यासाठी गिल त्याची खिल्ली उडवताना दिसत आहे. यावेळी संघातील सर्व खेळाडू एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. या सेलिब्रेशनमध्ये टीम इंडियाचे कोचिंग आणि सपोर्ट स्टाफही दिसत आहेत. प्रशिक्षक राहुल द्रविड लाल रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहेत.

  • सर्वजण आपल्या कुटुंबीयांसोबत : भारतीय संघाचे त्रिकूटही व्हिडिओमध्ये दिसत आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी दिसत आहेत. हे तिघेही फोटो काढताना दिसत आहेत. सूर्यकुमार यादवही मुलांसोबत आहेत. विराट कोहली, सिराज आणि कुलदीपही हसताना आणि विनोद करताना व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. शेवटी प्रत्येकाने आपापल्या कुटुंबियांसोबत ग्रुप फोटो काढला.

आज नेदरलॅंड्स संघासोबत सामना : विश्वचषकात आज राऊंड रॉबिन स्टेजचा 45 वा आणि शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय आणि नेदरलँड्स आमनेसामने असतील. बेंगरुळूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होत आहे. भारतीय संघानं यापुर्वीच उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. अशा स्थितीत हा सामना त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचा सराव असेल. त्यामुळं या सामन्यात भारतीय संघ सतत खेळणाऱ्या त्यांच्या एक किंवा दोन गोलंदाजांना विश्रांती देण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : पाकिस्तानच्या हरिस 'रौफ'नं केला 'हा' लाजिरवाणा विक्रम
  2. Cricket World Cup 2023 : पाकिस्तानचं विश्वचषकातील आव्हान अखेर संपुष्टात, इंग्लंडचा शानदार विजय
  3. Cricket World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचा बांग्लादेशवर ८ गडी राखून दणदणीत विजय, मिशेल मार्शच्या धुवांधार १७७ धावा

ABOUT THE AUTHOR

...view details