महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Ind vs NZ Semifinal : आयसीसीमधील न्यूझीलंडच्या वर्चस्वाला धक्का देण्याकरिता भारतीय संघ आज उतरणार मैदानात

Ind vs NZ Semifinal : भारत आणि न्यूझीलंडचे संघ आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 2023 च्या विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी खेळणार आहेत. आयसीसी स्पर्धांमधील आकडेवारीचा इतिहास पाहता न्युझीलंड संघ पुढे आहे. असे असले तरी भारतीय संघ या विश्वचषकात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सर्व 9 साखळी सामने जिंकून सेमीफायनलमध्ये पोहोचलाय.

Ind vs NZ Semifinal
Ind vs NZ Semifinal

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 7:09 AM IST

Updated : Nov 15, 2023, 7:20 AM IST

हैदराबाद Ind vs NZ Semifinal : इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 9 जुलै 2019 रोजी मँचेस्टरच्या मैदानावर खेळला जात होता. ढगाळ आकाशात न्यूझीलंडचा डाव असा ढासळला की संपूर्ण संघ 50 षटकात केवळ 239 धावाच करु शकला. पावसामुळं सामना राखीव दिवसापर्यंत पोहोचला. भारताचे 3 फलंदाज अवघ्या 5 धावांत बाद झाले. 24 धावा पूर्ण होईपर्यंत रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि दिनेश कार्तिक पॅव्हेलियनमध्ये परतले होते. 100 धावापूर्वी 6 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये पोहोचले. त्यानंतर जडेजा आणि धोनीमध्ये 116 धावांची आश्वासक भागीदारी झाली. हार्दिक पांड्यानं 32 धावा, महेंद्रसिंग धोनीनं 50 धावा आणि रवींद्र जडेजानं 77 धावा केल्या. मात्र ते शेवटी अपुरेच ठरले. संपूर्ण संघ 221 धावांवर गडगडला. न्यूझीलंडनं 18 धावांनी तो सामना जिंकला.

आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताची कामगिरी

न्यूझीलंड विरोधातील सामन्यात महेंद्रसिंग धोनी धावबाद होऊन ओल्या डोळ्यांनी पॅव्हेलियनमध्ये परतल्याचं चित्र आजही चाहत्यांच्या मनात ताजं आहे. धोनीच्या रनआऊटनंतर टीम इंडियाची मॅचवरील पकड सुटली. न्यूझीलंडचा संघ सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला. तेव्हा स्पर्धा मँचेस्टरमध्ये होती, यावेळी स्पर्धा मुंबईत होणार आहे. आयसीसी स्पर्धांच्या आकडेवारीत न्यूझीलंडची कामगिरी भारतीय संघापेक्षा जास्त असली तरी सध्याच्या विश्वचषकात भारतीय संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियानं साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघाला पराभूत करून उपांत्य फेरी गाठलीय. साखळी सामन्यांमध्ये भारतानं न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला. अशा परिस्थितीत यावेळी टीम इंडियाचा वरचष्मा दिसत असला तरी आयसीसी टूर्नामेंटमधील दोन्ही संघांची एकमेकांविरुद्धची कामगिरीवर नजर टाकल्यास न्युझीलंडचे पारडे जड वाटते.

विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध भारताची कामगिरी

ICC पुरुष एकदिवसीय विश्वचषक : 1975 पासून दर चार वर्षांनी होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण 10 वेळा सामना झाला आहे. यापैकी भारतीय संघानं 4 वेळा तर न्यूझीलंडनं 5 वेळा विजय मिळवलाय. तर 2019 च्या विश्वचषकात एक सामना पावसामुळं गमवावा लागला होता. आतापर्यंत झालेल्या 13 विश्वचषकांपैकी 8 विश्वचषकात दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघ आतापर्यंत 1975, 1979, 1983, 1992, 1999, 2003, 2019, 2023 च्या विश्वचषकात भिडले आहेत. 1987 आणि 2019 च्या विश्वचषकानंतर यावेळी दोघंही विश्वचषकात दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. 1987 मध्ये झालेले दोन्ही सामने भारतीय संघाच्या नावावर होते.

एकदिवसीय सामन्यांमधील भारत विरुद्ध न्यूझीलंडची आकडेवारी

ICC T20 विश्वचषक :T20 विश्वचषक 2007 साली सुरू झाले. T20 विश्वचषकात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघ सध्या T20 मध्ये नंबर वन संघ आहे आणि क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्येही संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिलीय. पण, टीम इंडियाला आतापर्यंत ICC T20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडला पराभूत करता आलेलं नाही. आतापर्यंत 8 टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये फक्त 3 सामने खेळले गेले आहेत. या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पराभव झालाय.

क्रिकेट विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध भारताची कामगिरी

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी : ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 1998 मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आली होती. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये होणारी ही स्पर्धा आतापर्यंत 8 वेळा खेळली गेली आहे. सुरुवातीला तो नॉकआऊट फॉरमॅटमध्ये खेळला जायचा, नॉकआऊट म्हणजे जर संघ सामना हरला तर तो स्पर्धेबाहेर जाईल. विजयी संघ स्पर्धेत पुढे जात राहील आणि अंतिम फेरी खेळेल. नंतर तो राऊंड रॉबिन स्वरूपात खेळला जाऊ लागला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये फक्त एकदाच सामना झालाय. 2000 साली खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता.

  • त्या बाद फेरीत भारत आणि न्यूझीलंड या संघांनी आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत आणि नंतर अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि कर्णधार सौरव गांगुलीच्या शानदार 117 धावा आणि सचिन तेंडुलकरच्या 69 धावांच्या जोरावर भारतीय संघानं 264 धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजांनीही सुरुवातीला शानदार गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या 5 फलंदाजांना 132 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र यानंतर अष्टपैलू ख्रिस क्रॅन्स आणि ख्रिस हॅरिस यांनी सहाव्या विकेटसाठी 122 धावांची भागीदारी केली. ख्रिस क्रेन्सनं 102 धावांची शानदार खेळी करत भारताच्या पकडीतून सामना हिसकावून न्यूझीलंडला चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवून दिली.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप : आयसीसीनं 2019 पासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरू केली. ज्या अंतर्गत दोन वर्षांच्या अंतरानंतर कसोटी खेळणाऱ्या संघांचे पूर्वनिर्धारित सामने ICC कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवले जातील. ते सामने जिंकणाऱ्या संघाला गुण मिळतील आणि दोन वर्षांच्या शेवटी, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पॉइंट टेबलमधील टॉप-2 संघांमध्ये खेळवला जाईल. भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये या चॅम्पियनशिप अंतर्गत आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारतीय संघानं फक्त एकदाच विजय मिळवलाय. आतापर्यंत केवळ दोनच जागतिक कसोटी चॅम्पियनशिप झाल्या आहेत. टीम इंडिया 2019-21 आणि 2021-23 मध्ये झालेल्या दोन्ही टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचली होती. पण, दोन्ही वेळा फायनलमध्ये पराभूत झाली. पहिल्यांदा न्यूझीलंड संघानं भारतीय संघाचा पराभव केला होता, तर दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियानं पराभव केला होता.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यासाठी वानखेडे सज्ज, असा असणार पोलीस बंदोबस्त
  2. Cricket World Cup 2023 IND vs NED : भारतीय संघानं दिवाळीला फोडले 'रेकॉर्ड'चे फटाके; नेदरलॅंड्स विरुद्धच्या सामन्यात केले 'हे' विक्रम
  3. Cricket World Cup 2023 : पुन्हा एकदा दिसणार भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य सामन्याचा थरार! टीम इंडिया मँचेस्टरचा बदला मुंबईत घेणार का?
Last Updated : Nov 15, 2023, 7:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details