महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs NZ Semifinal : रजनीकांत ते बिग बी; भारत-न्युझीलंड उपांत्य सामन्याला 'हे' दिग्गज सेलिब्रिटी सामन्याला लावणार हजेरी - बॉलिवूड अभिनेता आमिर खान

IND vs NZ Semifinal : आजच्या सामन्यासाठी अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डेव्हिड बॅकहम, बिग बी अमिताभ ते रजनीकांत;

IND vs NZ Semifinal
IND vs NZ Semifinal

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2023, 1:31 PM IST

मुंबई IND vs NZ Semifinal : विश्वचषकातील उपांत्य सामन्यांना आजपासून सुरुवात होणार आहे. आज क्रिकेटची पंढरी मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला उपांत्य सामना रंगणार आहे. या उपांत्य सामन्याला क्रिकेट, राजकीय, बॉलिवूड क्षेत्रातीत अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

कोणते सेलिब्रीटी येणार : आजच्या भारत न्यूझिलंड उपांत्य सामन्याला अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. यात इंग्लंडचा दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमचाही समावेश आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर प्रमाणेच बेकहॅम हा देखील युनिसेफचा गुडविल अम्बेसेडर असून तो सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. यामुळं आजच्या उपांत्य सामन्याला तो वानखेडेवर उपस्थिती लावणार असल्याची माहिती आहे. दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमसह विश्वचषकाचे गोल्डन पासधारक सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन आणि रजनीकांत हे दोघंही मॅच पाहण्यासाठी वानखेडे स्टेडिअमला येणार आहेत. यांच्यासह जगज्जेत्या वेस्टइंडिज संघाचा माजी कर्णधार सर विविअन रिचर्डस्, बॉलिवूड अभिनेता सलमान खान, आमिर खान, रिलायन्स फाऊंडेशनच्या नीता अंबानी हे देखील सामना पाहण्यासाठी हजर राहणार आहेत.

हाय व्होल्टेज उपांत्य सामन्यासाठी मुंबई पोलीस सज्ज : दिवाळीची सुट्टी आणि त्यात भारता विरोधात न्युझीलँडचा क्रिकेट सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. यानिमित्त देशभरात उत्साह आणि उत्कंठा पाहायला मिळत आहे. मुंबईत या सामन्याचा चांगलाच जल्लोष पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी मुंबई पोलीसही सज्ज झाले असून मैदानाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मुंबई पोलिसांनी या सर्व परिसरात बॅरिकेटिंग केली आहे. वानखेडे स्टेडियमच्या आत जाणाऱ्या सर्व गेटच्या रोडवर झिरो पार्किंग करण्यात येणार आहे. या सामन्यासठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर येत असल्यानं मुंबई पोलीस गेल्या दोन दिवसांपासून याची तयारी करत होते.

सामन्यापुर्वी मुंबई पोलिसांना धमकी : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य सामन्यादरम्यान काही मोठ्या घटना घडतील, अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीनं ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना दिलीय. या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वानखेडे स्टेडियम आणि परिसरात चोख बंदोबस्त तैनात केलाय. वानखेडेवरच्या सामन्यात मोठ्या घटना घडणार असल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीनं ट्विटरवर मुंबई पोलिसांना बंदूक, हँडग्रेनेड आणि गोळ्यांच्या फोटोमध्ये टॅगही केलंय. याशिवाय सामन्यादरम्यान आम्ही आग लावू, असा मेसेज देणारा फोटोही धमकीच्या मेसेजसोबत पोस्ट केला होता.

हेही वाचा :

  1. Ind vs NZ Semifinal : आयसीसीमधील न्यूझीलंडच्या वर्चस्वाला धक्का देण्याकरिता भारतीय संघ आज उतरणार मैदानात
  2. Cricket World Cup 2023 : विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यासाठी वानखेडे सज्ज, असा असणार पोलीस बंदोबस्त
  3. India vs New Zealand : भारत न्यूझीलंडमध्ये उपांत्य फेरीचा सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार; सामान्य मुंबईकरांना तिकीट नाही?

ABOUT THE AUTHOR

...view details