मुरादाबाद Mohammed Shami Coach :गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याकडं संपूर्ण देशाचचं नव्हे तर जगाच लक्ष लागलंय. भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांकडून क्रिकेट चाहत्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारतीय संघानं न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केलाय. न्यूझीलंडविरुद्ध 7 विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर देशाच्या नजरा लागल्या आहेत. अशा स्थितीत लहानपणापासून मोहम्मद शमीचे प्रशिक्षक असलेल्या बद्रुद्दीन यांना आशा आहे की शमी या सामन्यात चांगली कामगिरी करेल. तो संघाला विश्वचषकाच्या सामन्यात विजय मिळवून देईल.
मुरादाबादच्या जिगर कॉलनीत राहणारे बद्रुद्दीन हे लहानपणापासूनच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा प्रशिक्षक आहे. बदरुद्दीन टीएमयूमध्ये स्वतःची अकादमी चालवितात. त्यांच्या अकादमीतील इतर 3 खेळाडू, मोसीन खान, लखनऊ संघासोबत आयपीएल खेळत आहेत. आर्यन जुगल आणि शिवम वर्मा 19 वर्षाखालील विश्वचषक खेळले आहेत. शिवम शर्मा सतत पुढं जात आहे. आज होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रशिक्षक बदरुद्दीन यांना मोहम्मद शमीकडून काय अपेक्षा आहेत? ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.
- तुमचा शिष्य मोहम्मद शमी याने इतिहास रचला हे तुम्हाला कसे वाटते?
तुमचा कोणताही विद्यार्थी एवढी चांगली कामगिरी करतो, विशेषत: विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत विजय मिळवतो, ही खूप आनंदाची बाब असते. शमीच्या कामगिरीनं मला खूप आनंद झालाय. हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.
- शमीचं सुरुवातीचं प्रशिक्षण तुमच्यासोबतच झालं, तूम्ही त्याला कसं शिकवलं?
मोहम्मद शमी सुरुवातीपासूनच खूप शांत मुलगा आहे. तो खूप मेहनती आहे. बरीच मुलं आहेत, काही मुलं वेगळी आहेत. तो सुद्धा त्या वेगळ्या मुलांपैकी एक होता. कारण त्यानं जेवढी मेहनत केलीय, एवढी मेहनत जर कुठल्या मुलानं केली तर तो नक्कीच यशस्वी होईल.
- तूम्ही शमीशी कधी बोललात?
होय. मी टूर्नामेंट दरम्यान त्याच्याशी अनेकदा बोललो. शमी म्हणाला की तो सतत चांगली कामगिरी करत आहे. टीमही चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळं यावर्षी आम्ही वर्ल्ड कप जिंकत आहोत.
- शमीनं आत्तापर्यंत खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये तुम्हाला कधी वाटलं की त्याच्यात काहीतरी कमी आहे? तुम्हाला काही सल्ला द्यायचा आहे का? की तो खूप चांगला खेळत आहे आणि आता त्याची गरज नाही असं तुम्हाला वाटतं का?
सल्ले देण्याची गरज नाही. तो टूर्नामेंटमध्ये 5-5 विकेट आणि 4-4 विकेट घेतोय. हे बघा, त्यानं 7 विकेट्स घेतल्या. एकदिवसीय सामन्यात भारतासाठी एकाही वेगवान गोलंदाजानं एकाच वेळी इतक्या विकेट घेतलेल्या नाहीत.
- तुम्ही शमीला कधी भेटलात का?