महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : विश्वचषकात आणखी एक उलटफेर, नेदरलॅंडचा दक्षिण आफ्रिकेवर धमाकेदार विजय - विश्वचषक क्रिकेट स्पर्धा

Cricket World Cup २०२३ : विश्वचषकात आज झालेल्या सामन्यात नेदरलॅंडनं दक्षिण आफ्रिकेचा ३८ धावांनी पराभव केला. नेदरलॅंडनं दिलेल्या २४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ ४२.५ षटकांत २०७ धावांवर ऑलआऊट झाला.

SA vs NED world cup 2023
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2023, 12:41 PM IST

Updated : Oct 17, 2023, 11:02 PM IST

धर्मशाला Cricket World Cup २०२३ : क्रिकेट विश्वचषकातील आजच्या १५ व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर नेदरलॅंडचं आव्हान होतं. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे हा सामना खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा यानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

आफ्रिकेसमोर विजयासाठी २४६ धावांचं लक्ष्य : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना नेदरलॅंडच्या ४३ षटकांत २४५-८ धावा झाल्या आहेत. पावसामुळे हा सामना प्रत्येकी ४३ षटकांचा झाला. नेदरलॅंडकडून कर्णधार स्कॉट एडवर्ड्सनं ६९ चेंडूत सर्वाधिक ७८ धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून रबाडा, एनगिडी आणि जॅन्सननं प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

दोन्ही संघाची प्लेइंग ११ :

नेदरलँड - विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, बास डी लीड, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/विकेटकीपर), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन

दक्षिण आफ्रिका :क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेंबा बवुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, जेराल्ड कोएत्झी

दक्षिण आफ्रिका फॉर्ममध्ये : धर्मशालात आज दक्षिण आफ्रिका आपली विजयी घोडदौड कायम राखण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. त्यांनी स्पर्धेतील आपले पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. तर नेदरलँडला आपल्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ नेदरलँडच्या तुलनेत मजबूत असून स्पर्धेत त्यांनी आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोन दिग्गज संघांना धूळ चारली आहे. आजच्या सामन्यात नेदरलँडचा संघ तुलनेनं कमकुवत वाटत असला, तरी दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना सोपा असणार नाही. कारण पात्रता फेरीत नेदरलँडच्या संघानं चमकदार कामगिरी केली होती.

अफगाणिस्तान-इंग्लंड सामन्याची पुनरावृत्ती होणार का :याविश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानचा संघ दुबळा मानला जात होता. मात्र त्यांनी गतविजेत्या बलाढ्य इंग्लंडला दारूण पराभवाची धूळ चारली. विश्वचषकाच्या इतिहासातील हा मोठा उलटफेर मानला जातोय. त्यामुळे आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ नेदरलँडला निश्चितच हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : पाठीच्या दुखण्यानं अ‍ॅडम झाम्पा त्रस्त, तरीही श्रीलंकेच्या चार फलंदाजांना दाखवला तंबूचा रस्ता
  2. World Cup 2023 : पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनक; रोहित शर्मावर मुश्ताक मोहम्मद यांनी उधळली स्तुतीसुमने
  3. Cricket In Olympics : क्रिकेटसह आणखी ४ खेळांचा ऑलिम्पिकमध्ये समावेश, मुंबईत झाला निर्णय
Last Updated : Oct 17, 2023, 11:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details