लखनऊ Cricket World Cup 2023 SL vs NED : श्रीलंकेनं विश्वचषकात पहिला सामना जिंकलाय. विश्वचषकातील 19 वा सामनात श्रीलंकेनं नेदरलँड्सचा 5 विकेट्सनं पराभव करत पहिला विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्कडून सायब्रँड एंजेलब्रेक्ट (70), लोगान व्हॅन बीक (59) यांच्या खेळीच्या जोरावर 262 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघानं 48.2 षटकांत 263 धावा करत सामना जिंकला. गेल्या चार सामन्यांमधला श्रीलंकेचा हा पहिलाच विजय आहे.
नेदरलँड्सनं दिलेल्या 263 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला पहिला धक्का कुसल परेराच्या (18) रूपानं लवकर बसला. यानंतर कुसल मेंडिस 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. याशिवाय चरिथ असलंका 44 धावा करून बाद झाला तर, धनंजय डी सिल्वा 30 धावा करून बाद झाला. पथुम निसांका (54), सदिरा समरविक्रमानं संघाला विजय मिळवून दिला. सदीरानं 7 चौकारांच्या मदतीनं नाबाद 91 धावा केल्या. या स्पर्धेतील सदीराची ही दुसरी मोठी खेळी आहे.
नेदलॅंडची खराब सुरवात : नेदरलँड्सनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर चौथ्या षटकात विक्रमजीत सिंग (4) धावावर बाद झाला. त्यानंतर मॅक्स ओ'डॉड (16), कॉलिन अकरमन (29) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. बास डी लीडे (6), तेजा नदामानुरू (9), कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (16) यांना मोठा डाव खेळता आला नाही. नेदरलँड्सनं 91 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या. संघाच्या कठिन काळात एंजेलब्रेक्ट तसंच लोगन व्हॅन बीक (59) यांनी सामना सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली.
श्रीलंकेनं विश्वचषकात तिन्ही सामने गमावले :विश्वचषकातील 19 वा सामना श्रीलंका-नेदरलँड यांच्यात लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर सरु आहे. श्रीलंकेनं यंदाच्या विश्वचषकात तिन्ही सामने गमावले आहेत. त्याचबरोबर नेदरलँड्सनं तीनपैकी एक सामना जिंकला आहे. आजही श्रीलंका नेदरलँडविरुद्ध विजयाची अपेक्षा घेऊन खेळाला सुवात केलीय. श्रीलंकेचे खेळाडूही दुखापतींनी त्रस्त आहेत. कर्णधार दासुन शनाका दुखापतीमुळं आधीच बाहेर आहे, पाथिराना, परेराही दुखापतग्रस्त आहेत.