कोलकाता Cricket World Cup 2023 SA vs AUS Semifinal :कांगारुंनी दक्षिण आफ्रिकेला उपांत्य सामन्यात हरवलं आहे. तीन गडी राखून हा विजय मिळवला.ऑस्ट्रेलियाच्या डावाला सावध सुरुवात झाली. हेड आणि वॉर्नर धावपट्टीवर होते. त्यांनी सावध सुरुवात केली. मात्र वार्नरचा पहिला बळी गेला. तो २९ धावा काढून तंबूत परतला. त्याला एडन मार्करामनं बाद केलं. ऑस्ट्रेलियाच्या संघालाही सुरुवातीलाच गळती सुरू झाल्याचं दिसून आलं. वार्नरनंतर मार्श लगेच तंबूत परतला. त्यानं भोपळाही फोडला नाही. मार्श रबाडाच्या चेंडूवर झेलबाद झाला. ऑस्ट्रेलियानं १०० धावांचा टप्पा पूर्ण केला. १३ षटकांमध्ये हा टप्पा पूर्ण झाला. यानंतर चौथी विकेटही गेली. मार्नसची विकेट गेली. तो १८ धावा काढून पायचित झाला. मार्नस नंतर मॅक्सवेलचीही लगेच विकेट गेली. केवळ १ धाव काढून तो तंबूत परतला. यानंतर आणखी एक विकेट पडली ती स्टीव्ह स्मिथची. तो ३० धावा काढून बाद झाला. त्यानंतर जोस इंग्लिसही बाद झाला. विजयासाठी फक्त २० धावा बाकी असताना कांगारुंचे ७ गडी तंबूत परतले होते. १० षटकं बाकी असताना अशी परिस्थिती होती. त्यामुळे सामन्यातील उत्सुकता वाढली होती. शेवटी ऑस्ट्रेलियानं बाजी मारली. ३ गडी राखून हा दुसरा उपांत्य सामना त्यांनी जिंकला. आता अंतिम सामन्यात त्यांची गाठ सामन्यात भारताशी आहे.
तत्पुर्वी दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियापुढं फक्त २१३ धावांचं ठेवलंय. आफ्रिकेचा ४९.४ षटकात २१२ धावा झाल्या. मिलर आणि क्लासेन यांचीच आज बॅट तळपल्याचं दिसलं. मिलरनं १०१ धावा केल्या. तर क्लासेननं ४७ धावांची मजल मारली. इतर खेळाडू २० धावांच्या आतच बाद झाले. कर्णधार टेंबा बावुमा तर भोपळाही फोडू शकला नाही.
नाणेफेकीचा कौल साऊथ आप्रिकेनं जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्मय कर्णधार टेंबा बावुमानं घेतला. पण अतिशय खराब सुरवात आफ्रिकन फलंदाजांची झाली. क्विंटन डी कॉक आणि टेंबा बावुमा या सलामी जोडीनं संघाला निराश केलं. कर्णधार टेंबा बावुमाला त्याचं खातंही खोलता आलं नाही आणि तो मिशेल स्र्चच्या गोलंदाजीवर जोश इंगलिसच्या हातात झेल देऊन तंबूत परतला. त्या पाठोपाठ क्विंटन डी कॉकही केवळ 3 धावावर बाद झाला. सुरूवातीलाच हे दोन झटके बसल्यानंतर आफ्रिकेच्या तंबूत भीतीचं वातावरण निर्माण करण्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश आलं. रासी वान डेर डुसेननं केवळ सहा धावावरच मान टाकली आणि एडन मार्कराम 10 धावा असताना माघारी परतला. अशा प्रकारे 14 ओव्हरनंतर 4 बाद 44 धावा आफ्रिकेनं बनवल्या आहेत. मिशेल स्टार्च आणि जोश हेजलवूडनं पर्त्येकी 2 गडी बाद केले.
कोलकाता Cricket World Cup 2023 SA vs AUS Semifinal :विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. संपूर्ण स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं चमकदार कामगिरी केलीय. पण आज या मोठ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करणं सोपं नसेल. पाचवेळा विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलिया सहाव्या विजेतेपदाच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकू पाहणार आहे. त्याचवेळी, त्यांच्यावरील चोकर्सचं ( दक्षिण आफ्रिका) ओझं दूर करण्यासाठी दक्षिण आफ्रिका आज मैदानात उतरणार आहेत.