नवी दिल्ली Cricket World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकाचे साखळी सामने जवळपास संपले आहेत. भारत आणि नेदरलँड यांच्यात आज अखेरचा साखळी सामना खेळला जातोय. उपांत्य फेरीत ४ संघांनी आपलं स्थान पक्कं केलं, तर उरलेले ६ संघ शर्यतीतून बाहेर पडले. या सहा संघाची विश्वचषकात कशी कामगिरी राहिली, याबाबतची माहिती जाणून घेऊ या लेखातून.
या ४ संघांनी उपांत्य फेरीत केला प्रवेश : भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे. उपांत्य फेरी गाठणारा दक्षिण आफ्रिका हा दुसरा संघ ठरला. गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानावर आहेत. या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा ऑस्ट्रेलिया हा तिसरा संघ ठरला. ते गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. उपांत्य फेरी गाठणारा चौथा आणि शेवटचा संघ न्यूझीलंड आहे. ते गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिले.
कोणते संघ बाहेर पडले आणि त्यांची कामगिरी कशी होती? :
पाकिस्तान - विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पाकिस्तान हा शेवटचा संघ ठरला. अखेरच्या साखळी सामन्यात ते इंग्लंडकडून पराभूत होताच त्यांचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं. पाकिस्तान ८ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर राहिला.
मॅच | विजय | पराभव | गुणतालिकेत स्थान |
९ | ४ | ५ | ५ |
अफगाणिस्तान - अफगाणिस्तान संघानं या विश्वचषकात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. त्यांच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा शेवटपर्यंत कायम होत्या. अफगाणिस्तानची मोहीम ८ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर संपली.
मॅच | विजय | पराभव | गुणतालिकेत स्थान |
९ | ४ | ५ | ६ |