महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पीसीबी प्रमुख भारतात येणार - क्रिकेट विश्वचषक 2023

Cricket World Cup २०२३ : भारत विरुद्ध पाकिस्तान हा विश्वचषकातील बहुप्रतीक्षित सामना १४ ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख जका अशरफ भारतात येणार आहेत.

PCB chief Zaka Ashraf
PCB chief Zaka Ashraf

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 7:16 PM IST

हैदराबाद Cricket World Cup २०२३ :शनिवार, १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना बघायला अनेक व्हीआयपी गेस्ट येण्याची शक्यता आहे. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं स्टेडियम परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय.

पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसा मिळण्यासाठी विलंब : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख जका अशरफ देखील हा हाय व्होल्टेज सामना बघायला येणार आहेत. ते शनिवारी अहमदाबादला पोहोचतील. विश्वचषक कव्हर करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकरांना व्हिसा मिळविण्यासाठी पासपोर्ट जमा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर जका अशरफ यांनी हा निर्णय घेतला आहे. सुमारे ६० पाकिस्तानी पत्रकारांनी व्हिसासाठी अर्ज केला असून, आणखी विलंब झाल्यास ते या सामन्याचं कव्हरेज चुकवू शकतात. 'परराष्ट्र कार्यालयाशी झालेल्या माझ्या चर्चेमुळे व्हिसा विलंबाबाबत सकारात्मक प्रगती साधण्यात मदत झाली', असं जका अशरफ यांनी सांगितलं.

पाकिस्तानच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं : अशरफ यांनी पाकिस्तान संघाच्या विश्वचषकातील आतापर्यंतच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला. पाकिस्ताननं नेदरलँड आणि श्रीलंकेविरुद्धचे आपले पहिले दोन्ही सामने जिंकत विश्वचषक मोहिमेला धडाक्यानं सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर मंगळवारी त्यांनी श्रीलंकेविरुद्ध विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करत विजय मिळवला.

पाकिस्ताननं निर्भयपणे खेळावं : अशरफ म्हणाले की, 'विश्वचषकात आतापर्यंत खेळाडूंनी ज्या प्रकारे दोन्ही सामने जिंकले, त्यामुळे मी खूप खूश आहे. सध्या सुरू असलेल्या विश्वचषकातील यशस्वी मोहिमेसाठी पीसीबी व्यवस्थापन समिती आणि संपूर्ण देश खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे', असं ते म्हणाले. 'पाकिस्ताननं निर्भयपणे क्रिकेट खेळलं पाहिजे. मी संघाला प्रेरित करण्यासाठी भारताचा दौरा करत आहे. भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्यांना माझा हाच संदेश असेल की, ते आजपर्यंत जसे खेळत आले, तसेच त्यांनी निर्भयपणे खेळावं', असं अशरफ यांनी यावेळी नमूद केलं.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर बाबर आझमनं काय केलं, हैदराबादच्या ग्राउंड स्टाफला...
  2. Narendra Modi Meet Players : पंतप्रधान मोदींनी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंची भेट घेतली, सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन
  3. FIFA World Cup Host : कतारनंतर आशियातील आणखी एका देशात रंगणार फिफा वर्ल्डकपचा थरार? 'या' देशानं ठोकला यजमानपदाचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details