हैदराबाद Cricket World Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट टीम गेल्या एका आठवड्यापासून हैदराबादमध्ये आहे. त्यांनी आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात हैदराबादमध्ये केली आणि तेथे खेळले गेलेले दोन्ही सामने जिंकले. काल त्यांचा हैदराबादमधील शेवटचा दिवस होता. मंगळवारी, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि संपूर्ण पाकिस्तान टीमनं राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या प्रत्येक ग्राउंड स्टाफचं आभार मानलं. तसेच बाबर आझमनं ग्राउंड स्टाफला पाकिस्तान क्रिकेट वर्ल्ड कपची जर्सीही भेट दिली.
पाकिस्तान क्रिकेट टीम राजीव गांधी स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफसोबत हैदराबादच्या स्टेडियमवर सराव केला : पाकिस्तान क्रिकेट टीम सुमारे सात वर्षानंतर भारतात आली आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी त्यांनी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सराव केला. कालच्या सामन्यानंतर पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, हसन अली तसेच यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान हे ग्राउंड स्टाफसोबत ग्रुप फोटो घेताना दिसले.
पाकिस्तानची विजयी सुरुवात : पाकिस्ताननं या विश्वचषकात धडाक्यानं सुरुवात केली आहे. आपल्या पहिल्या सामन्यात त्यांनी नेदरलॅंडचा पराभव केला. मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात सदीरा समरविक्रमा आणि कुसल मेंडिस यांच्या शतकांच्या बळावर श्रीलंकेनं पहिल्या डावात ३४४/९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्ताननं पहिल्या १० षटकांत इमाम-उल-हक आणि कर्णधार बाबर आझम हे दोन महत्वाचे गडी गमावले. मात्र त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफीक यांनी शतक साजरं करत तिसऱ्या विकेटसाठी १७६ धावांची भागीदारी रचली. एका टप्प्यावर पाकिस्तानची परिस्थिती ३७/२ अशी होती. मात्र त्यानंतर त्यांनी सहा गडी राखून विजय मिळवला.
१४ ऑक्टोबर रोजी भारताविरुद्ध सामना : पाकिस्तान आता १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताविरुद्ध सामना खेळेल. पाकिस्ताननं पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला असला तरी कर्णधार बाबर आझम अजून फॉर्ममध्ये आलेला नाही. श्रीलंकेविरुद्ध तो १० धावांवर बाद झाला, तर नेदरलँड्सविरुद्ध तो केवळ ५ धावाचं करू शकला. त्यामुळे आता भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची आवश्यकता आहे.
हेही वाचा :
- FIFA World Cup Host : कतारनंतर आशियातील आणखी एका देशात रंगणार फिफा वर्ल्डकपचा थरार? 'या' देशानं ठोकला यजमानपदाचा दावा
- Cricket World Cup २०२३ : 'आमचे फलंदाज अपयशी ठरले', भारताविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर स्टीव्ह स्मिथची कबुली
- Asian Games २०२३ : ...तर भारतही चीन, जपानप्रमाणे ढिगानं पदकं जिंकेल, मात्र...