बेंगळुरू Cricket World Cup 2023 NZ vs SL : न्यूझीलंडनं विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. न्यूझीलंडनं गुरुवारी सामन्यात श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडचे गुणतालिकेत 10 गुण झाले आहेत. तर शेवटचा सामना गमावून श्रीलंका 4 गुणांसह स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
ट्रेंट बोल्टनं 3 बळी घेतले :बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर न्यूझीलंडनं संघानं 23.2 षटकांत 172 धावा करत विजय नोंदवला आहे. सलामीवीर डेव्हन कॉनवेनं 45 धावांची शानदार खेळी केलीय. रचिन रवींद्रनं 42 धावांची, डॅरिल मिशेलनं 43 धावांची शानदार खेळी केली. या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा डाव 46.4 षटकात 171 धावांवरच बाद झाला. सलामीवीर कुसल परेरानं 28 चेंडूत 51 धावांची खेळी केली. त्यानं या विश्वचषकातील सर्वात जलद अर्धशतक 22 चेंडूत केले. ट्रेंट बोल्टनं 3 बळी घेतले.
रचिन रवींद्र विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू :विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा रचिन रवींद्र पहिला फलंदाज ठरला आहे. रवींद्रनं विश्वचषकात 565 धावा केल्या आहेत. तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकला 550 धावा मागं सोडत पहिला क्रमांक पटकावलाय.
कॉनवे-रवींद्र यांनी केली दमदार सुरुवात :172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कॉनवे-रवींद्र यांनी न्यूझीलंडला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये झटपट धावा केल्या.
श्रीलंकेनं न्यूझीलंडला दिलं 171 धावांचं लक्ष्य : बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रीलंकंन नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा सलामीवीर कुसल परेरानं सर्वाधिक 51 धावा केल्या. त्यानं या विश्वचषकातील सर्वात जलद अर्धशतक झळकावलं. परेरानं 22 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. उर्वरित फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. अखेरीस महिष तेक्षानानं दिलशान मदुशंकासोबत 10व्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली.श्रीलंकंन संघाकडून ट्रेंट बोल्टनं 3 बळी घेतले. लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
तिक्षानं नाबाद 38 धावा :128 धावांवर 9वी विकेट गमावल्यानंतर महिष तेक्षानानं दिलशान मदुशंकासह संघाची धावसंख्या 171 धावांपर्यंत नेली. या दोघांनी अखेरच्या विकेटसाठी 87 चेंडूत 43 धावांची भागीदारी केली. धावांच्या बाबतीत विश्वचषकाती सर्वात मोठी भागीदारी आहे. महिष तिक्षानं नाबाद 38 धावा केल्या.
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : इंग्लंडचा नेदरलॅंडवर मोठा विजय, बेन स्टोक्सचं शानदार शतक
- Cricket World Cup 2023 : भारत-पाकिस्तान उपांत्य सामना अद्यापही शक्य, कसा ते जाणून घ्या