चेन्नई Cricket World Cup २०२३ :क्रिकेटविश्वचषकात आजच्या १६ व्या सामन्यात न्यूझीलंडसमोर अफगाणिस्तानचं आव्हान होतं. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडनं अफगाणिस्तानचा १४९ धावांनी दारूण पराभव केला.
अफगाणिस्तानचे फलंदाज अपयशी : न्यूझीलंडनं दिलेल्या २८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा एकही खेळाडू मोठी खेळी खेळू शकला नाही. रहमत शाहनं ६२ चेंडूत सर्वाधिक ३६ धावा केल्या. अजमातुल्ला ३२ चेंडूत २७ धावा करून बाद झाला. अफगाणिस्तानचे बाकी सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर आणि लॉकी फर्ग्युसननं प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या.
न्यूझीलंडच्या ५० षटकांत २८८ धावा : अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या ५० षटकांत २८८-६ धावा झाल्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सनं ८० चेंडूत सर्वाधिक ७१ धावा केल्या. तर कर्णधार टॉम लॅथमनं ७४ चेंडूत ६८ धावांचं योगदान दिलं. अफगाणिस्तानकडून नवीन-उल-हक आणि अजमातुल्ला ओमरझाई यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.
केन विल्यमसन दुखापतीमुळे बाहेर : या सामन्यात न्यूझीलंडच्या टीममध्ये नियमित कर्णधार केन विल्यमसनच्या जागी विल यंगला संधी मिळाली होती. तर अफगाणिस्तानच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. तो अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यामुळं सुमारे एक महिना स्पर्धेतून बाहेर पडलाय. उभय संघांनी आतापर्यंत केवळ दोनच सामने खेळले आहेत. हे दोन्ही सामने किवी संघानं जिंकले. हे दोन्ही सामने विश्वचषकात खेळले गेले आहेत.