कोलकाता Cricket World Cup २०२३ : क्रिकेट विश्वचषकातील आजचा २८ वा सामना नेदरलँड विरुद्ध बांग्लादेश यांच्यात झाला. कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर हा सामना खेळला गेला. नेदरलँडनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
स्कॉट एडवर्ड्सनं एकाकी किल्ला लढवला : प्रथम फलंदाजी करताना नेदरलॅंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर विक्रमजीत सिंग आणि मॅक्स ओडोड अनुक्रमे ३ आणि ० धावांवर बाद झाले. मात्र त्यानंतर आलेल्या वेस्ली बॅरेसीनं ४१ चेंडूत ४१ धावा करत पडझड रोखली. नेदरलॅंडकडून कर्णधार स्कॉट एडवर्ड्सनं एकाकी किल्ला लढवला. त्यानं ८९ चेंडूत ६८ धावांचं योगदान दिलं. नेदरलॅंडनं ५० षटकांत सर्व गडी गमावून २२९ धावा केल्या. बांग्लादेशकडून मुस्तफिजुर रहमाननं ३६ धावा देऊन २ बळी घेतले.
पॉल व्हॅन मीकरेनचे ४ बळी : धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशला सुरुवातीलाच झटका बसला. फॉर्ममध्ये असलेला लिट्टन दास १२ चेंडूत ३ धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मेहंदी हसन मिराजनं ४० चेंडूत ३५ धावा केल्या. मात्र त्यानंतर बांग्लादेशचा मिडल ऑर्डर ढेपाळला. अशाप्रकारे पूर्ण संघ ४२.२ षटकांत १४२ धावांवर ऑलसआऊट झाला. नेदरलॅंडच्या पॉल व्हॅन मीकरेननं बांग्लादेशी फलंदाजीचं कंबरडंच मोडलं. त्यानं २३ धावा देत ४ गडी बाद केले.