महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाला दुष्काळात तेरावा महिना! ग्लेन मॅक्सवेल नंतर 'हा' स्फोटक फलंदाज इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून 'आऊट'

Cricket World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक मोहिमेत आणखी एक अडथळा निर्माण झालाय. स्टार अष्टपैलू मिचेल मार्शनं वैयक्तिक कारणांमुळं विश्वचषक सोडलं असून तो मायदेशी परतलाय.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 10:36 AM IST

हैदराबाद Cricket World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मिचेल मार्शनं कौटुंबिक कारणांमुळं विश्वचषक स्पर्धेतून माघार घेतली. तो ऑस्ट्रेलियाला परत गेला आहे. मार्शच्या या निर्णयाबाबत सध्या फारशी माहिती उपलब्ध नाही, मात्र कौटुंबिक कारणामुळं त्यांनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. मार्श पर्थला रवाना झाला आहे. शनिवारी अहमदाबादमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार नाही. त्याआधी सोमवारी गोल्फ खेळताना दुखापत झाल्यानं ग्लेन मॅक्सवेलला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी अनफिट घोषित करण्यात आलं होतं. आता मार्शही अनुपस्थित राहणार असल्यानं ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा धक्का आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सोशल मिडीयावरून दिली माहिती : मिचेल मार्श बुधवारी रात्री घरी परतल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आज दिलीय. यासंदर्भात त्यांनी X (पुर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट केलीय. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्श वैयक्तिक कारणांमुळे बुधवारी रात्री उशिरा ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 मधून मायदेशी परतलाय. संघात त्याच्या पुनरागमनाचा कालावधी अद्याप निश्चित झालेला नाही.

निवडीसाठी 13 खेळाडू उपलब्ध :ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापुर्वी किरकोळ दुखापतीतून बरं होणे निश्चित मानलं जातंय. नेदरलँड आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मागील दोन सामन्यांत तो बाहेर पडला होता. कॅमेरून ग्रीनचंही संघात पुनरागमन निश्चित आहे, तर मार्नस लॅबुशेनही खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या लढतीसाठी ऑस्ट्रेलियाकडं फक्त 13 तंदुरुस्त खेळाडू असतील. तर शॉन अ‍ॅबॉट आणि अ‍ॅलेक्स कॅरी हेच इतर खेळाडू संघात उपलब्ध आहेत.

उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी विजय आवश्यक : सलामीवीर मिशेल मार्शच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ त्याच्या पसंतीच्या स्थानावर म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी परतलाय. परंतु, ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या समतोलाला हा एक मोठा धक्का आहे. त्यांचे दोन सर्वात स्फोटक आणि विध्वंसक खेळाडू मिशेल मार्श आणि मॅक्सवेल हे इंग्लंडविरुद्धच्या सामन्याला मुकणार आहेत. ऑस्ट्रेलियाला अद्याप उपांत्य फेरीत स्थान निश्चित करता आलेले नाही, तर इंग्लंडकडे आता गमावण्यासारखं काहीच राहिलेलं नाही.

हेही वाचा :

  1. World Cup 2023 IND vs SL : विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध विजयाची हॅट्रीक करण्यासाठी भारतीय संघ उतरणार मैदानात, काय असेल संघाची रणनीती?
  2. Hardik Pandya Injury : दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या संघात कधी परतणार? फिटनेसबाबत मोठं अपडेट जाणून घ्या
  3. Cricket World Cup 2023 NZ vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का

ABOUT THE AUTHOR

...view details