महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : माजी खेळाडू दानिश कनेरियाचे PCB वर गंभीर आरोप, एका पोस्टनं खळबळ

Cricket World Cup २०२३ : आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियानं आता पीसीबीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. विश्वचषकातील पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर त्याचं हे वक्तव्य समोर आलंय.

Danish Kaneria
Danish Kaneria

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 7:34 PM IST

नवी दिल्ली Cricket World Cup २०२३ : भारतात सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकात चाहत्यांना पाकिस्तानकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र पाकिस्तानची टीम चाहत्यांच्या या अपेक्षा पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरली आहे.

इंझमाम-उल-हकचा राजीनामा : स्वत: कर्णधार बाबर आझम देखील फलंदाजीत काही चमकदार कामगिरी करू शकलेला नाही. त्याच्या नेतृत्व क्षमतेवर देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली आहेत. बाबर आझमची कथित व्हॉट्सअअ‍ॅप चॅट समोर आली. त्यानंतर इंझमाम-उल-हकनं राष्ट्रीय पुरुष संघाच्या मुख्य सिलेक्टर पदाचा राजीनामा दिला. यावरून आता पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियानं पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (पीसीबी) अनेक गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाला दानिश कनेरिया : दानिश कनेरियानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट टाकत आपलं मत व्यक्त केलं. 'एकीकडे अफगाणिस्तान क्रिकेटकडे जास्त आणि राजकारणाकडे कमी लक्ष देत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेटकडे कमी आणि राजकारणाकडेच जास्त लक्ष देत आहे', असं तो म्हणाला. 'बाबर आझमच्या खासगी चॅट्स लीक झाल्या. इंझमाम-उल-हकनं प्लेयर मॅनेजमेंट कंपनीमध्ये त्याच्या कथित सहभागामुळं मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा दिला. पाकिस्तानचा संघ वाईट टप्प्यातून जात आहे. पीसीबी तसंच संघात काही मोठे बदल करण्याची हीच वेळ आहे', असं दानिश कनेरियानं नमूद केलं.

पाकिस्तानची निराशाजनक कामगिरी : या विश्वचषकात पाकिस्तानचे ६ सामन्यांत केवळ २ विजय असून, ४ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. ते ४ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानी आहेत. पाकिस्ताननं सलग दोन विजयांसह आपल्या मोहिमेची धडाक्यानं सुरुवात केली. मात्र त्यानंतर त्यांनी आपले पुढील चार सामने अनुक्रमे भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेकडून गमावले. त्यामुळे आता ते स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : 'हा माझ्यापेक्षाही चांगला गोलंदाज', वसीम अक्रमही झाला बुमराहच्या गोलंदाजीवर फिदा
  2. Cricket World Cup २०२३ : भारतानं साहेबांची जिरवली, 'विश्वविजेते' स्पर्धेतून बाहेर!

ABOUT THE AUTHOR

...view details