महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

निळ्या समुद्रासारखं दिसतंय नरेंद्र मोदी स्टेडियम, पाहा भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याची १५ सर्वोत्तम फोटो - क्रिकेट विश्वचषक २०२३

Narendra Modi Stadium In Photos : विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना पाहण्यासाठी भारतीय संघाचे चाहते जगभरातून अहमदाबादला पोहोचले आहेत. केवळ स्टेडियमच नाही तर बाहेरील दृष्य देखील निळ्याशार समुद्रासारखंच दिसतंय. पाहा वर्ल्ड कप फायनलची टॉप १५ छायाचित्रे....

Narendra Modi stadium in photos
Narendra Modi stadium in photos

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 7:07 PM IST

Updated : Nov 19, 2023, 7:12 PM IST

अहमदाबाद Narendra Modi Stadium In Photos :वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांनी सकाळपासूनच स्टेडियमजवळ मोठी गर्दी केली होती. स्टेडियमभोवतीचा संपूर्ण परिसर निळ्याशार समुद्रासारखा दिसत होता. भारताचे अनोखे चाहते केवळ देशातूनच नव्हे तर परदेशातूनही टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत.

  • भारतीय हवाई दलानं नाणेफेकीनंतर आणि सामना सुरू होण्यापूर्वी आकाशमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली. यावेळी स्टेडियममध्ये बसलेले सर्व प्रेक्षक स्वतःला आकाशाकडे पाहण्यापासून रोखू शकले नाहीत. भारतीय खेळाडूंनीही हवाई दलाच्या या परमॉरमन्सचा आनंद घेतला.
    भारतीय हवाई दलाची नेत्रदीपक कामगिरी
  • मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर स्टेडियमच्या मध्यभागी विश्वचषकाच्या चमकत्या ट्रॉफीसोबत दिसला. आपल्या आवडत्या खेळाडूला ट्रॉफीसह मैदानावर पाहिल्यानंतर भारतीय चाहत्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. २०११ नंतर सचिनला ट्रॉफीसोबत पाहणं ही चाहत्यांसाठी एक वेगळीच अनुभूती होती.
    सचिन तेंडुलकर स्टेडियममध्ये आला
  • अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आलेल्या या जोडप्याचा आनंद पाहण्यासारखा होता. आपल्या संघाचा जयजयकार करण्यासाठी हे जोडपं भारतीय ध्वज घेऊन पोहोचलं.
    हे जोडपं भारतीय ध्वज घेऊन पोहोचलं
  • गालावर भारताचा झेंडा रंगवणाऱ्या या महिलेचा उत्साहही पाहण्यासारखा आहे. भारतीय संघाला चिअर करण्यासाठी ही महिला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचली.
    गालावर भारताचा झेंडा रंगवणारी महिला
  • १ लाखांहून अधिक निळ्या जर्सीवाल्यांच्या गर्दीत काही पिवळ्या जर्सीही दिसल्या. आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे हे चाहते अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचले.
    ऑस्ट्रेलियाचे चाहते
    ऑस्ट्रेलियाचा चाहता
  • विराट कोहलीनं शानदारी कामगिरी करावी यासाठी हवन करताना काही भारतीय चाहते कॅमेऱ्यात कैद झाले.
    विराट कोहलीनं शानदारी कामगिरी करावी यासाठी हवन
  • भारतीय संघाचे चाहते सर्व वयोगटातील आहेत. या भारतीय चाहत्यानं आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या कपाळावर भारतीय ध्वजाची शाई लावली. याशिवाय त्याचा उत्साहही पाहण्यासारखा आहे.
    भारतीय संघाचे चाहते
    भारतीय संघाचे चाहते
  • १ लाखांपेक्षा जास्त लोकांची क्षमता असलेलं अहमदाबादचे हे नरेंद्र मोदी स्टेडियम चारही बाजूंनी निळ्याशार समुद्रासारखं दिसतं होतं. स्टेडियममध्ये सगळीकडे फक्त निळी जर्सी आहे.
    नरेंद्र मोदी स्टेडियम चारही बाजूंनी निळ्याशार समुद्रासारखं दिसतं होतं
    नरेंद्र मोदी स्टेडियम चारही बाजूंनी निळ्याशार समुद्रासारखं दिसतं होतं
  • विराट कोहली बॅटिंगला आला तेव्हा एक पॅलेस्टाईन समर्थक फॅन सुरक्षा तोडून विराट कोहलीच्या जवळ गेला. त्याच्या टी-शर्टवर 'फ्री पॅलेस्टाईन' लिहिलं होते. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला अटक केली.
    पॅलेस्टाईन समर्थक फॅन सुरक्षा तोडून विराट कोहलीच्या जवळ गेला
  • भारतीय संघ विश्वचषक जिंकेल या आशेनं हे चाहते भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेतून भारतात आले. त्यांचा प्रवास व्यर्थ जाणार नाही, अशी त्यांना आशा आहे.
    भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेतून भारतात आले
  • अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या बाहेर सकाळी ८ वाजताचं दृश्य असं होतं की पाय ठेवायला जागा नव्हती. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या गेटचे हे चित्र आहे. इथे स्टेडियम गाठण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
नरेंद्र मोदी स्टेडियमच्या बाहेरच दृष्य
Last Updated : Nov 19, 2023, 7:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details