महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : इंग्लंडचा नेदरलॅंडवर मोठा विजय, बेन स्टोक्सचं शानदार शतक - Ben Stokes

Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकात आज झालेल्या सामन्यात इंग्लंडनं नेदरलॅंडचा १६० धावांनी पराभव केला. इंग्लंडकडून अष्टपैलू बेन स्टोक्सनं शानदार शतकी खेळी केली. त्याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. वाचा पूर्ण बातमी..

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 10:36 PM IST

पुणे :क्रिकेट विश्वचषकाचा ४०वा सामना आज इंग्लंड आणि नेदरलॅंड यांच्यात झाला. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडनं नेदरलॅंडवर १६० धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं निर्धारित ५० षटकांत ९ गडी गमावून ३३९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलॅंडचा संघ ३७.२ षटकांत १७९ धावा करून ऑलआऊट झाला.

बेन स्टोक्सचं शतक : टॉस जिंकून इंग्लडनं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर डेव्हिड मलाननं ७४ चेंडूत धमाकेदार ८७ धावा ठोकल्या. बेयरस्टो १५ धावा करून बाद झाला, तर रूटनं २८ धावांचं योगदान दिलं. गेल्या काही सामन्यांपासून फॉर्मसाठी झगडणारा अष्टपैलू बेन स्टोक्स आज फुल फार्मात आला. त्यानं शानदार शतकी खेळी केली. तो ८४ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीनं १०८ धावा करून बाद झाला. अखेरच्या षटकांत क्रिस वोक्सनं ४५ चेंडूत ५१ धावा केल्या. अशाप्रकारे इंग्लंडनं ५० षटकांत ३३९-९ धावांचा डोंगर रचला. नेदरलॅंडकडून बास दे लिडनं ७४ धावा देत ३ बळी घेतले.

इंग्लंडच्या फिरकीपटूंची कमाल : धावांचा पाठलाग करताना नेदरलॅंडचा एकही खेळाडू मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. नेदरलॅंडकडून कर्णधार एडवर्ड्सनं ४२ चेंडूत ३८ धावा केल्या. तर बरेसी ६२ चेंडूत ३७ धावा करून रनआऊट झाला. तेजा निदामानरू ३४ चेंडूत ४१ धावा करून नाबाद राहिला. इंग्लंडकडून फिरकीपटू मोईन अली आणि आदिल रशीद यांनी घातक गोलंदाजी केली. या दोघांनी अनुक्रमे ४२ आणि ५४ धावा देत ३-३ बळी घेतले.

गुणतालिकेत इंग्लंडची स्थिती : गतविजेता इंग्लंड आधीच या स्पर्धेतून बाहेर पडला होता. या विश्वचषकातील त्यांचा हा केवळ दुसरा विजय आहे. ते ८ सामन्यात ४ गुणांसह गुणतालिकेत ७ व्या स्थानी राहिले. नेदरलॅंडचे देखील ८ सामन्यात २ विजयांसह ४ गुण आहेत. मात्र खराब रन रेटमुळे त्यांना तळाच्या स्थानी समाधान मानावं लागलं. बांग्लादेश आणि श्रीलंका अनुक्रमे ८व्या आणि ९व्या स्थानी राहिले. आता उपांत्य फेरीतील ४थ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरशीची लढत आहे.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : भारत-पाकिस्तान उपांत्य सामना अद्यापही शक्य, कसा ते जाणून घ्या
  2. ICC ODI Ranking : शुभमन गिलचा भीम पराक्रम! असं करणारा केवळ चौथा भारतीय
  3. Cricket World Cup 2023 : मॅक्सवेलच्या अंगात आलं! अफगाणिस्तानला एकहाती धोबीपछाड दिला

ABOUT THE AUTHOR

...view details