बेंगळुरु Cricket World Cup 2023 ENG vs SL :ICC क्रिकेट विश्वचषक 2023 च्या 25 व्या सामन्यात श्रीलंकेनं गतविजेत्या इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 10 गडी गमावून केवळ 156 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघानं सहज लक्ष्य गाठले. श्रीलंकेनं 25.4 षटकात केवळ 2 गडी गमावून 160 धावा केल्या. श्रीलंकेसाठी सलामीवीर पथुम निसांकानं 77 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय सदिरा समरविक्रमानं 65 धावांची खेळी केली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीनं श्रीलंकेच्या दोन विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर इंग्लंडकडून बेन स्टोक्सनं सर्वाधिक 43 धावांची खेळी खेळली.
डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टोची 45 धावांची भागीदारी : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली होती. डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो यांनी मिळून 6.3 षटकात 45 धावांची भागीदारी केली. अँजेलो मॅथ्यूजनं मलानला यष्टिरक्षक कुसल मेंडिसकडं झेलबाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. मलाननं सहा चौकारांच्या मदतीनं 28 धावा केल्या.
बेन स्टोक्सने केल्या सर्वाधिक धावा : इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 43 धावांची खेळी खेळली. तर श्रीलंकेकडून लाहिरू कुमारानं सर्वाधिक 3 बळी घेतले. दोन्ही संघांनी आतापर्यंत ४-४ सामने खेळले असून त्यापैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. विश्वचषक 2023 पॉइंट टेबलमध्ये श्रीलंका संघ चांगल्या रनरेटसह सातव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर गतविजेता इंग्लंड गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. कर्णधार जोस बटलर 8 धावा करून बाद झाला. आजचा सामना हरणारा संघ विश्वचषकातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 4-4 सामने खेळले आहे. विश्वचषक 2023 पॉइंट टेबलमध्ये श्रीलंका संघ चांगल्या रनरेटसह सातव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर गतविजेता इंग्लंड गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.
जोस बटलरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा :इंग्लंडला दुसरा धक्का जो रूटच्या रूपानं बसला, जो तीन धावा करून मॅथ्यूजच्या थ्रोवर बाद झाला. यानंतर कसून राजितानं दुसरा सलामीवीर जॉनी बेअरस्टोची मोठी विकेट घेतली. बेअरस्टोनं 31 चेंडूंत 30 धावा केल्या, ज्यात तीन चौकारांचा समावेश आहे. इंग्लिश चाहत्यांना जोस बटलरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण लाहिरू कुमाराच्या चेंडूवर त्यानं केवळ 8 धावा केल्या. बटलरनंतर इंग्लंडनं लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अलीची विकेटही गमावली.