महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : मॅक्सवेलच्या अंगात आलं! अफगाणिस्तानला एकहाती धोबीपछाड दिला

Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकात आज पाच वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियासमोर अफगाणिस्तानचं आव्हान होतं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानचा ३ गडी राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश केला.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 7, 2023, 10:20 PM IST

Updated : Nov 7, 2023, 10:52 PM IST

मुंबई Cricket World Cup 2023 :क्रिकेट विश्वचषकात आज झालेल्या अत्यंत रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानचा ३ गडी राखून पराभव केला. अफगाणिस्ताननं दिलेल्या २९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था एकवेळ ९१-७ अशी दयनीय झाली होती. मात्र त्यानंतर वानखेडेवर ग्लेन मॅक्सवेल नावाचं वादळ आलं आणि त्यासमोर अफगाणिस्तानचे गोलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले.

मॅक्सवेल नावाचं वादळ : मॅक्सवेलनं १२८ चेंडूत २१ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीनं २०१ धावांची तुफान खेळी केली. दुसऱ्या टोकावर कर्णधार कमिन्सनं त्याला उत्तम साथ दिली. तो ६८ चेंडूत १७.६५ च्या स्ट्राईक रेटनं १२ धावा करून नाबाद राहिला. या दोघांनी मिळून ७ व्या गड्यासाठी २०१ धावांची विक्रमी भागिदारी केली. मॅक्सवेलनं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात धावांचा पाठलाग करताना पहिलं द्विशतक ठोकलं. यासह त्यानं रन चेजमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही आपल्या नावे केला.

अफगाणिस्तानची प्रथम फलंदाजी :प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताननं निर्धारित ५० षटकांत २९१-५ धावा केल्या. सलामीवीर इब्राहिम झद्राननं शानदार शतकी खेळी केली. तो १४३ चेंडूत १२९ धावा करून नाबाद राहिला. अखेरच्या षटकांत राशिद खाननं जोरदार फटकेबाजी केली. त्यानं केवळ १८ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीनं ३५ धावा ठोकल्या. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडनं ३९ चेंडूत २ बळी घेतले.

कर्णधार कमिन्सनं उत्तम साथ दिली : अफगाणिस्ताननं दिलेल्या २९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. हेड शून्यावर बाद झाला. तर वॉर्नरनं १८ धावा केल्या. ही मॅच खऱ्या अर्थानं गाजवली ती ग्लेन मॅक्सवेलनं! ऑस्ट्रेलियाचे ९१ धावांवर ७ गडी तंबूत परतले होते. तेव्हा कर्णधार पॅट कमिन्स क्रिजवर आला. या दोघांनी तेथून हळूहळू क्रिजवर जम बसवायला सुरुवात केली. कमिन्सनं एका टोकानं किल्ला चिवट फलंदाजी करत किल्ला लढवून ठेवला. तर दुसऱ्या टोकावरून मॅक्सवेलनं अफगाणी गोलंदाजांना पिटायला सुरुवात केली. या दोघांनी मिळून नाबाद २०१ धावांची भागिदारी केली आणि ऑस्ट्रेलियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : टीम इंडियाच्या विश्वचषकातील दमदार कामगिरीमागचं रहस्य काय?
  2. Cricket World Cup 2023 : बांग्लादेश टीमला मोठा धक्का! शाकीब अल हसन विश्वचषकातून बाहेर
  3. Angelo Mathews : बांगलादेशचा रडीचा डाव, अँजेलो मॅथ्यूजला 'या' नियमाअंतर्गत केलं बाद
Last Updated : Nov 7, 2023, 10:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details