महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : अफगाणिस्तान आता कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो, पाकिस्तानवरील विजय अनपेक्षित नव्हता - पटवाल

Cricket World Cup २०२३ : गतविजेत्या इंग्लंडला पराभूत केल्यानंतर, अफगाणिस्ताननं सोमवारी चेन्नईत पाकिस्तानचा पराभव केला. अफगाणिस्तानचे माजी फलंदाजी प्रशिक्षक उमेश पटवाल यांच्या मते हे अनपेक्षित नव्हतं. 'ईटीव्ही भारत'नं खास त्यांच्याशी संवाद साधला.

Afghanistan
Afghanistan

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 7:29 PM IST

हैदराबाद Cricket World Cup २०२३ :विश्वचषक जसजसा पुढे सरकत आहे, तसतशा अनेक अनपेक्षित गोष्टी आपल्याला पाहायला मिळतायेत. गतविजेत्या इंग्लंडला पराभूत केल्यानंतर 'कमकुवत' अफगाणिस्तानची माजी विश्वचषक विजेत्या पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव करत आणखी एक उलटफेर केला. यामुळे आता अफगाणिस्तानच्या संघाला कमी लेखणं इतर संघांना महागात पडेल, यात शंका नाही.

पाकिस्तानवर आपला पहिला वनडे विजय नोंदवला : चेपॉक येथील सामन्यात अफगाणिस्ताननं बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानवर आपला पहिला वनडे विजय नोंदवला. पाकिस्ताननं निर्धारित ५० षटकांत २८२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. मात्र अफगाणिस्ताननं इब्राहिम झद्रानच्या ८७ आणि रहमत शाहच्या नाबाद ७७ धावांच्या जोरावर हे लक्ष्य सहा चेंडू राखून सहज गाठलं.

अफगाणिस्तान कोणत्याही देशाला पराभूत करण्यास सक्षम : अफगाणिस्तानच्या या विजयानंतर संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक उमेश पटवाल यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास संवाद साधला. 'अफगाणिस्तानच्या या विजयानं नेदरलँड, स्कॉटलंड आणि झिम्बाब्वे सारख्या क्रिकेट खेळणाऱ्या छोट्या राष्ट्रांचं मनोबल उंचावलंय. जर अफगाणिस्तान, इंग्लंड आणि पाकिस्तानला पराभूत करू शकत असेल, तर ते कोणत्याही देशाला पराभूत करण्यास सक्षम आहे', असं पटवाल म्हणाले.

अफगाणिस्तानही इतर संघांच्या बरोबरीचा : उमेश पटवाल यांच्या मते, या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास वाढेल. ते म्हणाले की, विश्वचषक सुरू होण्यापूर्वी त्यांनी भाकीत केलं होतं की, हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखालील संघ दोन मोठ्या संघांना पराभूत करेल. 'पूर्वी अफगाणिस्तानविरुद्ध मॅच असली की भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका तसंच पाकिस्तान हे संघ आपले तरुण आणि नवोदित खेळाडू मैदानात उतरवायचे. मात्र आता या संघांना कळेल की अफगाणिस्तानही आपल्या बरोबरीचा आहे. जर आता या संघांना अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर त्यांना त्यांचे सर्वोत्तम अकरा खेळाडू मैदानात उतरावे लागतील', असं उमेश पटवाल म्हणाले.

आणखी एक विजय मिळू शकतो : 'विश्वचषकातील उर्वरित चार सामन्यांत अफगाणिस्तानला आणखी एक विजय निश्चितच मिळू शकेल', असा विश्वास उमेश पटवाल यांनी व्यक्त केला आहे. अफगाणिस्ताननं आता पाकिस्तानवर मात केल्यानंतर श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ पूर्ण तयारीनिशी उतरतील. अफगाणिस्तानचा पुढील सामना ३० ऑक्टोबर रोजी पुण्यात श्रीलंकेशी होणार आहे.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : अफगाणिस्ताननं केला आणखी एक उलटफेर, पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव
  2. Bishan Singh Bedi Death : भल्याभल्यांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवणाऱ्या बिशन सिंग बेदी यांचं निधन

ABOUT THE AUTHOR

...view details