महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : न्यूझीलंडचा बांग्लादेशवर ८ गडी राखून शानदार विजय, मिशेल-विल्यमसनची अर्धशतकं - Bangladesh vs New Zealand

Cricket World Cup २०२३ : विश्वचषकात आज झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं बांग्लादेशचा ८ गडी राखून पराभव केला. बांग्लादेशनं दिलेल्या २४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं ४२.५ षटकांत २४८-२ धावा केल्या. ४९ धावा देऊन ३ बळी घेणारा लॉकी फर्ग्युसन सामनावीर ठरला.

Cricket World Cup
Cricket World Cup

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2023, 3:07 PM IST

Updated : Oct 13, 2023, 9:59 PM IST

चेन्नई Cricket World Cup २०२३ : क्रिकेट विश्वचषकाचा ११ वा सामना न्यूझीलंड आणि बांग्लादेश यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. न्यूझीलंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशनं ५० षटकांत २४५-९ धावा केल्या. बांग्लादेशकडून मुशफिकुर रहीमनं ७५ चेंडूत सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली. तर न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसननं ४९ धावा देत ३ बळी घेतले.

बांग्लादेशची खराब सुरुवात : प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशची सुरुवात खराब झाली. सलामीवीर लिट्टन दास पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला ट्रेंट बोल्टनं मॅट हेन्रीच्या हाती झेलबाद केलं. तन्झिद हसन १७ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. त्याला लॉकी फर्ग्युसननं कॉनवेच्या हाती झेलबाद केलं. मेहंदी हसन मिराजला लॉकी फर्ग्युसननं ३० धावांवर बाद केलं. मॅट हेन्रीनं त्याचा झेल घेतला.

दोन्ही संघाची प्लेइंग ११ :

बांग्लादेश : लिट्टन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, मेहंदी हसन मिराज, शाकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), तौहिद हृदोय, महमुदुल्ला, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान

न्यूझीलंड :डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

दोन्ही संघाचा फॉर्म : न्यूझीलंड संघानं विश्वचषकाची धडाक्यानं सुरुवात केली आहे. त्यांनी त्यांचे पहिले दोन्ही सामने जिंकले. न्यूझीलंडनं इंग्लंड आणि नेदरलँड्सचा पराभव केला. दुसरीकडे, बांग्लादेशनं दोन पैकी एक सामना जिंकला तर एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. बांगलादेशनं अफगाणिस्तानचा ६ विकेट्सनं पराभव केला. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यांना १३७ धावांनी दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात न्यूझीलंडचं लक्ष आपला रन रेट वाढवण्याकडे असेल.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup Kane Williamson available : केन विल्यमसन बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज
  2. Cricket World Cup experience : कॅनव्हासवर रंगणार विश्वचषकाचा थरार, क्रिकेटपटूंच्या अलवार अनुभवांची 'ऑडिबल'नं आणली खास मेजवानी
  3. Cricket World Cup २०२३ : विश्वचषकात रोहितची गाडी सुसाट! सर्वाधिक शतक, सर्वाधिक षटकार; जाणून घ्या किती रेकॉर्ड मोडले
Last Updated : Oct 13, 2023, 9:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details