नवी दिल्ली Angelo Mathews :श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूज सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात टाइमआउट घोषित होणारा पहिला खेळाडू ठरला. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तो टाइमआउट झाला. या आधी कोणत्याही फॉरमॅटमध्ये असं केवळ सहा वेळा घडलं आहे.
काय घडलं : अँजेलो मॅथ्यूज जेव्हा फलंदाजीला उतरला तेव्हा त्याचा हेल्मेटचा पट्टा काम करत नव्हता. त्यामुळे त्यानं आणखी एक हेल्मेट मागितलं, ज्यासाठी अतिरिक्त वेळ लागला. कोणीतरी त्याला श्रीलंकेच्या डगआउटमधून बदली हेल्मेट आणलं. मात्र तोपर्यंत बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसननं अपील करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानावरील पंच नियमानुसार त्याला बाद घोषित करण्याशिवाय काहीही करू शकत नव्हते.
नियम काय सांगतात : मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) च्या नियमानुसार, 'विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाजाच्या निवृत्तीनंतर, पुढील फलंदाजानं किंवा दुसऱ्या फलंदाजानं तीन मिनिटांच्या आत चेंडू खेळण्यास तयार असणं आवश्यक आहे. असं न झाल्यास येणाऱ्या फलंदाजाला बाद घोषित करण्यात येईल. तथापि, एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या खेळाच्या परिस्थितीनुसार, ही वेळ दोन मिनिटं निश्चित करण्यात आली आहे. या विश्वचषकाचे नियम सांगतात की, 'विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाजाच्या निवृत्तीनंतर, पुढच्या फलंदाजानं चेंडू खेळण्यासाठी २ मिनिटांच्या आत तयार असणं आवश्यक आहे. नाहीतर येणारा फलंदाज आऊट होईल.
शाकिबनं अपील मागे घेण्यास नकार दिला : या घटनेनंतर त्रासलेल्या अँजेलो मॅथ्यूजनं मैदानावरचं आपलं मत व्यक्त केलं. त्यानं बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनला आपली अपील मागे घेण्यास सांगितली, परंतु शकिबनं अपील मागे घेण्यास नकार दिला. ड्रेसिंग रूममध्ये परतताना मॅथ्यूजनं निराशेनं आपलं हेल्मेट फेकलं. त्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिस हा बांगलादेशचे प्रशिक्षक आणि श्रीलंकेचा माजी खेळाडू चंडिका हथुरुसिंघे यांच्याशी या घटनेबाबत बोलताना दिसला.
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : असालंकाचं शानदार अर्धशतक; वाचा स्कोर
- Prasidh Krishna : प्रसिद्ध कृष्णा लहानपणापासूनचं आहे प्रतिभावान गोलंदाज, विश्वचषकात निवड होणं अभिमानास्पद
- Cricket World Cup 2023 : टीम इंडियानं केला आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम, अवघ्या ८३ धावांत गुंडाळलं!