महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ICC World Cup Trophy : रामोजी फिल्म सिटीमध्ये प्रदर्शित होणार आयसीसी विश्वचषक ट्रॉफी, जाणून घ्या ट्रॉफीबद्दल सर्वकाही - क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी

ICC World Cup Trophy : जगातील सर्वात मौल्यवान ट्रॉफींपैकी एक, आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ ची ट्रॉफी आज हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटी येथे प्रदर्शित केली जात आहे. या ट्रॉफीची आजच्या बाजारात किंमत ३० लाखांपेक्षा जास्त आहे. जाणून घ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीबद्दल सर्वकाही..

ICC World Cup Trophy
ICC World Cup Trophy

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 2:35 PM IST

हैदराबाद ICC World Cup Trophy : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आयसीसी क्रिकेट विश्वचषकाची ट्रॉफी रामोजी फिल्मसिटीमध्ये प्रदर्शनासाठी आणण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी रामोजी फिल्मसिटीच्या कॅरम गार्डनमध्ये या ट्रॉफीचं प्रदर्शन होईल.

आयसीसी ट्रॉफीला कोण स्पर्श करू शकेल : आयसीसी ट्रॉफी मॅनेजमेंट प्रोटोकॉलमध्ये असं नमूद केलं आहे की, केवळ काही निवडक व्यक्तींना छायाचित्रांसाठी ट्रॉफीला स्पर्श करण्याची किंवा उचलण्याची परवानगी आहे. केवळ आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकलेले खेळाडू, सध्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक किंवा संबंधित पात्रता स्पर्धांमध्ये भाग घेणारे खेळाडू ट्रॉफीला स्पर्श करू शकतात किंवा तिला उचलू शकतात.

मूळ ट्रॉफी कोणाला मिळते : आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी हा जागतिक क्रिकेटचा वारसा आहे. यावर आयसीसीचा पूर्ण अधिकार आहे. प्रत्येक आवृत्तीत, विजेत्यांना फक्त ट्रॉफीची प्रतिकृती दिली जाते. तर मूळ ट्रॉफीवर त्या वर्षीच्या विजेत्यांची नावं असतात.

ही ट्रॉफी कशी दिसते : ही ट्रॉफी लंडनमधील क्राउन ज्वेलर्स गॅरार्ड यांनी डिझाईन आणि तयार केली आहे. चांदी-गिल्टनं बनवलेल्या, ६० सेमी उंच ट्रॉफीमध्ये तीन चांदीच्या स्तंभांवर माऊंट केलेला सोनेरी ग्लोब आहे. याला स्टायलिश क्रिकेट बॉलच्या रुपात तयार करण्यात आलं आहे. हे स्तंभ, खेळाचे तीन आवश्यक पार्ट दर्शवतात - फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण.

ट्रॉफी बनवण्यासाठी किती खर्च आला :आयसीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॉफीची किंमत ४०,००० पौंडपेक्षा जास्त आहे (आजच्या दरात ही रक्कम ३०,८५,३२० रुपये आहे). ट्रॉफीचं वजन सुमारे ११ किलो आहे. ट्रॉफीची रचना प्लॅटोनिक परिमाणांमध्ये केली गेली आहे जेणेकरून ती कोणत्याही कोनातून पाहिली जात असली तरीही तिची विशिष्टता दिसून येईल.

ट्रॉफी कधी तयार केली : सध्याची ट्रॉफी प्रथम आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक १९९९ साठी तयार करण्यात आली होती. पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचं नाव ट्रॉफीच्या तळाशी लिहिलेलं असतं. यासोबतच तिची हुबेहूब प्रतिकृती आगामी प्रत्येक विश्वचषक विजेत्या संघाला सुपूर्द करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

आयसीसीनं ट्रॉफी कशी लॉन्च केली : आयसीसीनं ही प्रतिष्ठित ट्रॉफी स्ट्रॅटोस्फियरमध्ये लॉन्च केली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर लँडिंग करण्यापूर्वी ट्रॉफी पृथ्वीपासून १,२०,००० फूट उंचीवर, -६५ अंश सेल्सिअस तापमानात तरंगत होती.

ट्रॉफीचा आतापर्यंतचा दौरा :लॉन्च झाल्यानंतर ट्रॉफीनं कुवेत, बहरीन, मलेशिया, अमेरिका, नायजेरिया, युगांडा, फ्रान्स, इटलीसह १८ देशांना भेट दिली. यजमान देश भारतात परतण्यापूर्वी तिला अमेरिकेलाही नेण्यात आलं होतं. २७ जून रोजी भारतातून सुरू झालेला ट्रॉफीचा दौरा ४ सप्टेंबर रोजी पुन्हा यजमान देशात परतला.

हेही वाचा :

  1. ICC World Cup Anthem : क्रिकेट वर्ल्डकपचं अधिकृत अ‍ॅन्थम जारी, रणवीर सिंहनं केलाय धमाकेदार डान्स

ABOUT THE AUTHOR

...view details