महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ICC World Cup Anthem : क्रिकेट वर्ल्डकपचं अधिकृत अ‍ॅन्थम जारी, रणवीर सिंहनं केलाय धमाकेदार डान्स - ODI World cup 2023

ICC World Cup Anthem : क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी अधिकृत अ‍ॅन्थम जारी करण्यात आलं आहे. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह या गाण्यावर नाचताना दिसतोय.

ICC World Cup Anthem
ICC World Cup Anthem

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 12:48 PM IST

Updated : Sep 20, 2023, 2:42 PM IST

मुंबईICC World Cup Anthem : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी अधिकृत अ‍ॅन्थम जारी केलं. 'दिल जश्न बोले' असे या गाण्याचे बोल आहेत. गाण्यात बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह 'वर्ल्ड कप वन-डे एक्स्प्रेस' मध्ये नाचताना दिसतो. प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांनी या गाण्याला संगीत दिलंय.

रणवीर सिंहची प्रतिक्रिया : क्रिकेट विश्वचषक १२ वर्षानंतर भारतात परततोय. यापूर्वी २०११ मध्ये भारतात विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा १० शहरांमध्ये वर्ल्डकप खेळवला जाईल. वर्ल्ड कपचं अँथम लॉन्च करताना सुपरस्टार रणवीर सिंह म्हणाला, 'एक कट्टर क्रिकेट फॅन म्हणून क्रिकेट विश्वचषकासाठी अँथम लाँच करणं खरोखरच सन्मानाची बाब आहे. आपल्या सर्वांना आवडणाऱ्या खेळाचा हा उत्सव आहे, असं तो म्हणाला.

गाण्याचे श्रेय : या गाण्यात सोशल मीडिया स्टार धनश्री वर्मा, गौरव तनेजा, स्काउट आणि बी यूनिक नाचताना दिसतात. हे अधिकृत गाण प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्ती यांनी संगीतबद्ध केलं आहे. गायक नकाश अझीझ, श्रीरामा चंद्रा, अमित मिश्रा, जोनिता गांधी, आकासा, चरण यांनी गाण्याला आपला आवाज दिला. तर गाण्याचे बोल श्लोक लाल आणि सावेरी वर्मा यांनी लिहिले आहेत.

गाण्यात कोण-कोण दिसतं : या गाण्याची थीम ट्रेनच्या बोगीची आहे, ज्यामध्ये रणवीर सिंह आणि विश्वचषकाचा अधिकृत शुभंकर आहेत. गाण्याची सुरुवात रणवीर सिंहच्या संवादानं होते. त्यानंतर संगीतकार प्रीतम चालत्या ट्रेनच्या बोगीवर दिसतात. त्यानंतर हे गाणं चाहत्यांना त्यांच्या आवडत्या संघाची जर्सी घालून बाहेर पडण्याचं आवाहन करतं. एस्पोर्ट्स गेमर आणि सोशल मीडिया स्टार स्काउट या व्हिडिओमध्ये आहेत. त्यानंतर बी यूनिक, विराज घेलानी, गौरव तनेजा (फ्लाइंग बीस्ट), क्रीडा प्रस्तुतकर्ता जतिन सप्रू आणि शेवटी फिरकीपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माही व्हिडिओत दिसते.

हेही वाचा :

  1. ICC World Cup 2023: बिग बी, सचिन तेंडुलकर नंतर बीसीसीआयने रजनीकांतला दिलं गोल्डन तिकीट
  2. IND vs SL Asia Cup 2023 Final : आशिया चषकाच्या इतिहासात मोहम्मद सिराजनं रचला नवा इतिहास, जाणून घ्या कामगिरी
  3. Asia Cup २०२३ : 'आयसीसी फक्‍त बकवास करते. यामुळे क्रिकेट...', श्रीलंकेचा विश्वविजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा भडकला
Last Updated : Sep 20, 2023, 2:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details