महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ICC World Cup 2023 : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी; 'या' तारखेपासून विश्वचषकाच्या तिकिटांची ऑनलाइन विक्री सुरू होणार - Online sale of tickets from August 10

बीसीसीआयने 10 ऑगस्टपासून विश्वचषक सामन्यांच्या तिकिटांची ऑनलाइन विक्री सुरू करण्याची तयारी केली आहे. तसेच स्टेडियममध्ये चाहत्यांना मोफत पिण्याचे पाणी मिळणार आहे. यासाठी बीसीसीआयने कोका कोलासोबत भागीदारी केल्याची चर्चा आहे.

ICC World Cup 2023
आयसीसी विश्वचषक २०२३

By

Published : Jul 29, 2023, 5:05 PM IST

नवी दिल्ली : क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. बीसीसीआयने 2023 विश्वचषकासाठी तिकीट बुकिंगची तारीख जाहीर केली आहे. आगामी विश्वचषकाची तिकिटे 10 ऑगस्टपासून ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध केली जातील. या सोबतच बोर्डाने विश्वचषकादरम्यान स्टेडियममध्ये मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

क्रीडाप्रेमींना मोठा दिलासा मिळणार : बीसीसीआयच्या या निर्णयामुळे क्रीडाप्रेमींना मोठा दिलासा मिळणार आहे. सामन्यांदरम्यान मोफत पिण्याचे पाणी देण्याच्या निर्णयाचे कौतुक होत आहे. ऑक्‍टोबरच्या अखेरीस भारतात वर्ल्डकप होत आहे. त्या दरम्यान अनेक ठिकाणी चाहत्यांसाठी असलेल्या सुविधा आणि सेवांबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात होते. त्याच अनुषंगाने आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी चाहत्यांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.

बीसीसीआय कोका कोलासोबत भागीदारी करणार : बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की, बोर्ड चाहत्यांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यावर काम करत आहे. चाहत्यांना मोफत पिण्याचे पाणी देण्यासाठी BCCI कोका कोलासोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहे. जय शहा यांनी विविध राज्य संघटनांच्या प्रमुखांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत विविध संघटनांकडून फीडबॅक घेण्यात आला होता.

स्टेडियमच्या सुविधा वाढवल्या जातील : बैठकीत मोफत पिण्याच्या पाण्यासह, हाउसकीपिंग, स्वच्छतागृहे आणि क्रिकेट स्टेडियमची स्वच्छता राखण्यावरही चर्चा झाली. या सोबतच, क्रीडाप्रेमींना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तिकिटांच्या किंमती आणि वेळापत्रकावरही चर्चा करण्यात आली आहे. यापूर्वी स्टेडियममध्ये चाहत्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. तिकीट खरेदीच्या अनुभवापासून ते स्टेडियमच्या स्वच्छतेपर्यंत अनेक वेळा चाहत्यांनी आपली निराशा व्यक्त केली आहे. आता विश्वचषकासारख्या स्पर्धेचे आयोजन भारतात केले जात असल्याने, चाहत्यांना आनंदी ठेवण्यासाठी स्टेडियमच्या सुविधा वाढवल्या जातील अशी अपेक्षा आहे.

तिकीट विक्रीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल होणार नाही : यापूर्वी तिकीट विक्रीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल बनविण्याची चर्चा होती. मात्र बीसीसीआयने तुर्तास या योजनेतून माघार घेतली आहे. ऑनलाइन तिकिटे डुप्लिकेट होण्याची भीती बीसीसीआयला आहे. हे टाळण्यासाठी त्यांनी सध्याचे तिकीट मॉडेलच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड कप 2023 ची सुरुवात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने होईल. अंतिम सामना देखील येथेच खेळवला जाणार आहे.

हेही वाचा :

  1. Asian Games 2023 : टीम इंडियाला मिळाली थेट क्वार्टरफायनलमध्ये एंट्री! जाणून घ्या कशी
  2. India Vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलणार, 'हे' आहे कारण
  3. Rinku Singh : आशियाई क्रीडा स्पर्धेत रिंकू सिंह असणार टीम इंडियाचा हुकुमी एक्का

ABOUT THE AUTHOR

...view details