महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ICC World Cup 2023 :विश्वचषकादरम्यान कडक सुरक्षा, खलिस्तान समर्थकांच्या नापाक कारवायांमुळं पोलीस सतर्क - ICC World Cup 2023

ICC World Cup 2023 : धरमशाला क्रिकेट स्टेडियमवर आयसीसी क्रिकेट विश्वचषकाअंतर्गत ५ सामने होणार आहेत. अशा परिस्थितीत कांगडा जिल्हा आणि धर्मशाला शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसंच ड्रोनच्या साहाय्यानं देखरेख केली जात आहे. याशिवाय धर्मशाळेतील सामन्यासाठी वाहतूक आराखडाही तयार करण्यात आला आहे. वाचा संपूर्ण बातमी

ICC World Cup 2023
ICC World Cup 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 9:29 PM IST

धरमशालाICC World Cup 2023 : ICC क्रिकेट विश्वचषकासंदर्भात धरमशाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 5 सामने खेळवले जाणार आहेत. अशा परिस्थितीत धर्मशाळेत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. धर्मशाला स्टेडियम, कांगडा विमानतळ आणि खेळाडूंचा मुक्काम असलेल्या हॉटेल्सवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. धर्मशाला शहर 15 सेक्टरमध्ये विभागले गेले आहे. 1500 पोलीस आणि होमगार्डचे जवान तैनात करण्यात आले आहेत. रस्त्यांपासून ते आकाशापर्यंत, प्रत्येक कोपऱ्यावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. त्याचबरोबर मोठ्या संख्येनं येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग आणि वाहतूक मार्गाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

सामन्यापूर्वी खलिस्तान समर्थकांच्या नापाक कारवाया : विश्वचषक सामन्यापूर्वीच धर्मशालामध्ये खलिस्तान समर्थकांच्या नापाक कारवाया उघडकीस आल्या आहेत. धर्मशाळेतील एका सरकारी विभागाच्या भिंतीवर खलिस्तानच्या समर्थनार्थ नारे लिहिण्यात आले होते. त्यानंतर पोलीस प्रशासन पूर्ण अलर्ट मोडमध्ये आलं आहे. जिल्हा कांगडा एसपी शालिनी अग्निहोत्री यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी सदर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. यासोबतच सरकारी कार्यालयांमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे. या संदर्भात आजूबाजूच्या लोकांचीही चौकशी केली जात आहे.

धरमशाला क्रिकेट विश्वचषक सामन्यासाठी सज्ज : धरमशाला आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पूर्णपणं तयार आहे. सुरक्षेसाठी 1500 पोलीस आणि होमगार्ड कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. शहराची विभागणी 15 सेक्टरमध्ये करण्यात आली असून त्यापैकी 9 सेक्टर हे स्टेडियम कॉम्प्लेक्समध्येच असतील. शहराबाहेरही स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. एसपी कांगडा शालिनी अग्रीहोत्री यांनी सांगितले की, सामन्यादरम्यान दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विविध गेटवर विशेष तुकड्या तैनात केल्या जातील. जेणेकरून सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची, विशेषत: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करता येईल. धर्मशाळा स्टेडियमच्या प्रवेशद्वारातून आणि विविध स्टँडवर लोकांना फक्त तिकीट घेऊनच प्रवेश करता येईल, कोणालाही तिकीटाशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.

ड्रोनच्या माध्यमातून सुरक्षेवर नजर : धरमशाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या आयसीसी विश्वचषकाच्या सामन्यांदरम्यान ड्रोनद्वारे सुरक्षा आणि वाहतुकीवर लक्ष ठेवली जाणार आहे. ड्रोनद्वारे प्रत्येक प्रकारच्या हालचालींवर नजर ठेवणं सोपं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलिसांकडं 4 ड्रोन आहेत. अशा परिस्थितीत सामन्यांच्या वेळी सुरक्षेसह वाहतूक सुरळीत चालवण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. सामन्यांदरम्यान विविध ठिकाणी पार्किंगची जागा चिन्हांकित केली जाते. तेथे वाहनांशी छेडछाड होणार नाही याची काळजी घेण्यासाठी ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. एएसपी हितेश लखनपाल म्हणाले की, पोलीस मुख्यालयाकडून सर्व जिल्ह्यांना उच्च दर्जाचे ड्रोन देण्यात आले आहेत. ज्यामध्ये जीपीएसद्वारे मॉनिटरिंग केलं जातं.

आपत्तींमध्येही ड्रोन उपयोगी :धर्मशाला येथे होणाऱ्या सामन्यांमध्ये ड्रोनचीही मदत घेतली जाणार आहे. हिमाचलच्या डोंगराळ राज्यात ड्रोनची अनेक बाबतीत मोठी मदत होते. सामन्यांच्या वेळी सुरक्षा आणि वाहतुकीसाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. एसपी शालिनी अग्निहोत्री यांनी सांगितले की, आयपीएल सामन्यादरम्यानही पोलिसांनी सामना संपल्यानंतर एक तासाने वाहतूक सुरळीत केली होती. यावेळीही प्रेक्षकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी अशीच व्यवस्था करण्यात येणार आहे. सामन्यांदरम्यान नवरात्रीही साजरी करण्यात येणार असल्याचं एसपी म्हणाले. अशा परिस्थितीत वाहतूक सुव्यवस्था राखणे हे अतिरिक्त आव्हान असेल, परंतु तरीही प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करतील. कोणाला संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवा असं त्या म्हणाल्या.

सुमारे एक लाख लोकांवर पोलिसांची नजर : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक सामन्यांदरम्यान सुमारे एक लाख लोकांवर पोलिसांची नजर असणार आहे. एसपी कांगडा शालिनी अग्रीहोत्री यांनी सांगितले की, सामन्यांदरम्यान 20 ते 22 हजार प्रेक्षक धर्मशाळेत पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी 8 ते 10 हजार वाहनेही शहरात दाखल होतील, अशा स्थितीत जिल्हा पोलीस सामन्यांदरम्यान सुमारे एक लाख लोकांवर नजर ठेवतील. वाहतूक व्यवस्था चांगली राहावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. विश्वचषक सामन्यांसाठी वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. कोणत्या सामन्याला किती गर्दी जमण्याची शक्यता आहे, याबाबत आयोजकांशी बोलणी सुरू आहेत. 22 ऑक्टोबर रोजी भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान स्टेडियम हाऊस फुल्ल होतील. तिकीट कंपनीनं वर्ल्ड कपची ऑनलाइन तिकिटं विकण्यासाठी दोन पर्याय ठेवले होते. ज्यामध्ये होम डिलिव्हरी आणि काउंटरवर तिकीट काढणं समाविष्ट होतं. अशा परिस्थितीत, होम डिलिव्हरी प्रणालीमुळं, तिकीट ब्लॅक होण्याची शक्यता कमी आहे.

हेही वाचा -

  1. Sachin Tendulkar : शून्याची भीती प्रत्येक खेळाडूला वाटते; सचिन तेंडुलकरनं सांगितलं कारण...
  2. Asian Games २०२३ : तिरंदाजीच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकून ओजसनं नागपूरकरांना दिली 'सुवर्णभेट'
  3. Cricket World Cup 2023 : 'ही' आहे पाकिस्तान संघाची कमजोरी, वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details