बेसिन रिझर्व्ह (वेलिंग्टन):आयसीसी महिला विश्वचषक 2022 ( ICC Women's World Cup 2022 ) मधील 21 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघात बेसिन रिझर्व्ह येथे पार पडला. या सामन्यात मेग लॅनिंगच्या कर्णधार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पाच गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर या स्पर्धतील आपल्या सलग सहाव्या विजयाची नोंद केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला दक्षिण आफ्रिकेने 272 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 45.2 षटकात 5 गडी लक्ष्य पूर्ण केले. उपांत्य फेरीत आधीच आपले स्थान पक्के करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचे सहा सामन्यांतून 12 गुण ( Australian team 12 points ) झाले आहेत. त्यामुळे कांगारू संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान आणखी मजबूत केले आहे.
स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेचा पहिला पराभव -
दरम्यान दक्षिण आफ्रिका संघाला या स्पर्धेत प्रथमच पराभवाचा सामना ( South Africa first defeat ) करावा लागाला. या संघाची पाच सामन्यातील हा पहिलाच पराभव आहे. हा संघ चार सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तत्पुर्वी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीसाठी दक्षिण आफ्रिका संघाला आमंत्रित केले होते. दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लॉरा वॉलवॉर्ट आणि कर्णधार सन लुस यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 5 बाद 271 धावा केल्या होत्या.