केपटाऊन :महिला टी-20 विश्वचषकाचा 14 वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा 11 धावांनी पराभव केला आहे. नाणेफेक जिंकताच भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित 20 षटकात 7 विकेट गमावत 151 धावा केल्या आणि भारताला 152 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात भारतीय संघ निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 140 धावाच करू शकला.
भारताविरुद्ध इंग्लंडचा सलग सहावा विजय : भारताकडून स्मृती मानधनाने सर्वाधिक 52 आणि ऋचा घोषने 47 धावा केल्या. यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून नताली स्कायव्हरने सर्वाधिक 50 धावा केल्या. तिच्याशिवाय एमी जोन्सने 40 आणि हीदर नाइटने 28 धावांचे योगदान दिले. भारताकडून रेणुका सिंहने पाच तर शिखा पांडे आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली. टी-20 विश्वचषकात भारताविरुद्ध इंग्लंडचा हा सलग सहावा विजय आहे.
भारताचा डाव : पहिली विकेट, शेफाली वर्मा 11 चेंडूत 8 धावा. तिला लॉरेन बेलने नताली स्किव्हरच्या हाती झेलबाद केले. दुसरी विकेट, जेमिमा रॉड्रिग्ज 16 चेंडूत 13 धावा. तिला सारा ग्लेनने नताली स्किव्हरच्या हाती झेलबाद केले. तिसरी विकेट, हरमनप्रीत कौर 6 चेंडूत 4 धावा. तिला सोफी एक्लेस्टोनने अॅलिस कॅप्सीच्या हातून झेलबाद केले. चौथी विकेट, स्मृती मानधना 41 चेंडूत 52 धावा, तिला सारा ग्लेनने बाद केले. पाचवी विकेट, दीप्ती शर्मा 9 चेंडूत 7 धावा. 19व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ती धावबाद झाली.