महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Women World Cup : न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात झालेल्या रोमांचक सामन्यात वेस्ट इंडिजचा विजय - आयसीसी महिला विश्वचषक अपडेट्स

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिज महिला संघाने 3 धावांनी विजय ( WI Women won by 3 runs ) मिळवला.

WI
WI

By

Published : Mar 4, 2022, 5:53 PM IST

माउंट मौनगानुई : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 ( ICC Women ODI World Cup 2022 ) स्पर्धेला शुक्रवारी (4मार्च) न्यूझीलंडमध्ये सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज ( New Zealand v West Indies ) संघात खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिज महिला संघाने 3 धावांनी न्यूझीलंड महिला संघावर मात केली. त्याचबरोबर या संघाने आपल्या विश्वचषक अभियानाची सुरुवात विजयाने केली.

या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी वेस्ट इंडिज संघाला आमंत्रित केले होते. वेस्ट इंडिज संघाने निर्धारित 50 षटकांत 9 बाद 259 धावा केल्या होत्या. त्यामुळे न्यूझीलंड संघाला 260 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघ 49.5 षटकांत 256 धावा करत सर्वबाद झाला. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाने 3 धावांनी विजय ( WI Women won by 3 runs ) मिळवला.

वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करताना त्यांची सुरुवात खराब झाली. त्यानंतर हेली मॅथ्यूजने शतकी खेळी ( Haley Mathews scored a century ) करत, आपल्या संघाला सावरले. तिने 128 चेंडूंचा सामना करता 16 चौकार आणि 1 षटकार लगावत 119 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. तसेच इतर फलंदाजांमध्ये एस टेलर 30 आणि चेडियन नेशनने 36 धावांची खेळी केली. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाने 250 धावांचा टप्पा पार केला. न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजी करताना लया तहहूने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जेस्स केर 2, हन्ना रोव 1 आणि अमेलिया केर 1 विकेट्स घेतली.

वेस्ट इंडिजने न्यूझीलंड संघाला 260 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्यांचा पाठलाग करायला उतरलेल्या न्यूझीलंड संघाकडून सोफी डिव्हायनने सर्वाधिक ( Sophie Divine century ) धावा केल्या. तिने 127 चेंडूचा सामना करताना 10 चौकारांच्या मदतीने 108 धावांची शानदार खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंड संघ हा सामना जिंकेल अशी अवस्था निर्माण झाली होती. मात्र ब्रूक हॅलीडेची 44 धावांची खेळी वगळता इतर कोणताच फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ 256 धावांवर सर्वबाद झाला. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजी करताना हेली मॅथ्यूज, अनिसा मोहम्मद आणि डिऑन्ड्रा डॉटीन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर सेलमन आणि हेन्री यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details