माउंट मौनगानुई -आयसीसी महिला विश्वचषक ( ICC Women's World Cup ) स्पर्धेतील सहावा सामना पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने पाकिस्तानवर 7 विकेट्सने ( Pakistan lost by 7 wickets ) विजय मिळवला. पाकिस्ताने संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटतकांत 6 बाद 190 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला 191 धावांचे लक्ष्य मिळाले होते. ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाने 34.4 षटकांत 3 बाद 194 धावा करत लक्ष्य पूर्ण केले. त्यामुळे पाकिस्तानला या स्पर्धेतील दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागेल.
महिला विश्वचषक स्पर्धेतील सहाव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने ( Australia captain Meg Lanning ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात पाकिस्तानची सुरुवात अतिशय खराब झाली. पाकिस्ताने आपली पहिला विकेट 11 धावसंख्येवर गमावली. ज्यामध्ये सलामी फलंदाज सिद्रा अमिन (9) धावांवर बाद झाली. त्यानंतर ही पाकिस्तान संघाची पडझड सुरुच राहिली. मात्र कर्णधार बिस्माहा मारुफने एक बाजू संभाळताना पाकिस्तान कडून सर्वाधिक धावा केल्या. तिने 122 चेंडूत 78 धावांची खेळी केली.