महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ICC U19 WC : अंडर १९ क्रिकेट विश्वचषक : भारताची विजयी सुरुवात, दक्षिण आफ्रिकेचा ४५ धावांनी पराभव - १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक ( Under 19 Cricket World Cup ) सामन्यात भारतीय संघाने धडाकेबाज सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा ४५ धावांनी पराभव करत भारताने विश्वचषकात विजयी वाटचाल सुरु केली ( India Defeat South Africa By 45 Runs ) आहे.

अंडर १९ क्रिकेट विश्वचषक : भारताची विजयी सुरुवात, दक्षिण आफ्रिकेचा ४५ धावांनी पराभव
अंडर १९ क्रिकेट विश्वचषक : भारताची विजयी सुरुवात, दक्षिण आफ्रिकेचा ४५ धावांनी पराभव

By

Published : Jan 16, 2022, 4:36 AM IST

जॉर्जटाउन (गियाना) :यश धुलच्या ( Captain Yash Dhull ) नेतृत्वाखालील भारतीय संघाने सध्या सुरू असलेल्या अंडर १९ क्रिकेट विश्वचषकात ( Under 19 Cricket World Cup ) विजयी सुरुवात केली. येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर ब गटातील पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ४५ धावांनी पराभव ( India Defeat South Africa By 45 Runs ) केला. भारताचा पुढील सामना १९ जानेवारीला आयर्लंडशी होणार ( India Vs Ireland ICC U19 WC ) आहे.

दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात

२३३ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. इथन जॉन कनिंगहॅम याला पहिल्याच षटकात राजवर्धन हंगरगेकरने बाद केले. त्यानंतर व्हॅलेंटाइन किटाईम आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. परंतु विकी ओसवालने किटाईमला २५ धावातच पॅव्हेलियनमध्ये परत पाठवल्यामुळे ही भागीदारी खंडित झाली.

विकी ओसवालने घेतल्या पाच विकेट्स

त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने नियमित अंतराने विकेट गमावणे सुरूच ठेवले. ब्रेव्हिस ६५ धावांवर बाद झाल्यानंतर सातत्याने दक्षिण आफ्रिकेच्या विकेट्स पडत गेल्या. आणि अखेरीस, ४५ धावांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. भारताकडून विकी ओस्तवालने पाच विकेट्स घेतल्या तर राज बावाने चार गडी बाद केले.

कर्णधार यश धूलची धडाकेबाज खेळी

तत्पूर्वी, कर्णधार यश धुलने १०० चेंडूत ८२ धावांची धडाकेबाज खेळी केली. भारताने एकूण २३२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मॅथ्यू बोस्टने तीन गडी बाद केले. धुलशिवाय कौशल तांबेनेही ३५ धावांची खेळी केली तर शेख रशीदने ३१ धावा केल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details