दुबई:आयसीसीने बुधवारी पुरुष खेळाडूंची कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यामध्ये खुप मोठे बदल झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा ( Cricketer Usman Khwaja ) याने पाकिस्तानविरुद्धच्या अलीकडेच संपलेल्या मालिकेत दमदार कामगिरी केली होती. त्याने बुधवारी ताज्या आयसीसी कसोटीतील फलंदाजी क्रमवारीत डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांना मागे टाकले आहे. तसेच त्याने सहा स्थानांनी झेप घेतल सातवे स्थान काबीज केले आहे. त्यामुळे भारताचा रोहित शर्मा आणि कोहली एका स्थानाने घसरून अनुक्रमे आठव्या आणि 10व्या स्थानावर पोहोचले आहेत. त्याचबरोबर रिषभ पंत टॉप-10 मधून बाहेर पडलो असून आता तो अकराव्या स्थानावर आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ख्वाजा हा एक दमदार फलंदाज राहिला होता. त्याने पाच डावांत 165.33 च्या सरासरीने 496 धावा केल्या होत्या. या मालिकेत त्याची धावसंख्या 97, 160, नाबाद 44, 91 आणि नाबाद 104 होती. त्यानंतर त्याने वर्षाची सुरुवात सिडनी येथे नवीन वर्षाच्या अनिर्णित अॅशेस कसोटीत पाठोपाठ शतके करून केली आणि दोन वर्षांहून अधिक काळानंतर त्याचे फॉर्मेटमध्ये पुनरागमन झाले. पाकिस्तानचा अब्दुल्ला शफीक, जो 79.40 च्या सरासरीने 397 धावांसह मालिकेत दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, तो 22 स्थानांनी झेप घेत पहिल्या 40 मध्ये पोहोचला आहे, तर मोहम्मद रिझवान आठ स्थानांनी घसरून 19 व्या स्थानावर आला आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रुट ( England captain Joe Root ) चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशेनच्या नंतर अनुक्रमे यादीत 2 आणि 3 क्रमांकावर आहेक. अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारताचा रवींद्र जडेजा अव्वल स्थानावर कायम ( Ravindra Jadeja remains at the top ) आहे. तर रविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला दुसऱ्या क्रमांकावरून हटवले आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू काईल मेयर्सने ग्रेनाडा येथील तिसर्या कसोटीत इंग्लंडविरुद्धच्या शानदार कामगिरीनंतर 29 स्थानांनी झेप घेत 11 वे स्थान पटकावले आहे.