महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ICC Test Rankings: अष्टपैलूंच्या यादीत रविंद्र जडेजा पुन्हा नंबर वन; जाणून घ्या इतर खेळाडूंची क्रमवारी

आयसीसीने बुधवारी वनडे आणि कसोटीची क्रमवारी जाहीर झाली आहे. ज्यामध्ये काही खेळाडूंना फायदा झाला आहे, तर काही खेळाडूंना क्रमवारीत नुकसान झाले आहे. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा ( All-rounder Ravindra Jadeja ) पुन्हा एकदा कसोटीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल ठरला आहे.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja

By

Published : Mar 23, 2022, 7:41 PM IST

दुबई:आयसीसीने बुधवारी कसोटी आणि वनडे क्रिकेटची ताजी क्रमवारी ( Test and ODI cricket rankings ) जाहीर केली आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत रविंद्र जडेजाने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले ( Ravindra Jadeja at number one ) आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मोहाली येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत नाबाद 175 धावा आणि नऊ विकेट्स घेतल्यानंतर जडेजा पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. मात्र, गेल्या आठवड्यात त्याला होल्डरकडून स्थान गमवावे लागले होते. जडेजा 385 रेटिंग गुणांसह अव्वल आणि होल्डर दुसऱ्या स्थानी आहे.

भारतीय अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन आश्विनने रविंद्र जडेजानंतर आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. त्याचबरोबर गोलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आपल्या चौथ्या स्थानावर कायम ( Jaspreet Bumrah remains fourth position ) आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा फलंदाजांच्या ताज्या कसोटी क्रमवारीत सातव्या क्रमांकावर घसरला आहे. त्याचबरोबर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर स्थिर आहेत.

दरम्यान पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम ( Captain Babar Azam ), जो कराचीतील मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करत होता, त्याने क्रमवारीत 5व्या क्रमांकावर जाण्यासाठी तीन स्थानांची कमाई केली. त्याच सामन्यातील फलंदाजीसह इतर स्टार परफॉर्मर्स मोहम्मद रिझवान आणि उस्मान ख्वाजा यांनीही मोठी झेप घेतली आहे. दुसऱ्या डावात 104 धावांची नाबाद खेळी केल्याने रिझवान सहा स्थानांनी वर पोहोचला आहे. तो डेव्हिड वॉर्नरसह संयुक्तपणे 11 व्या क्रमांकावर आहे. कराचीमध्ये 160 आणि 44 धावा करणाऱ्या ख्वाजाने अकरा स्थानांनी प्रगती केली असून तो 13 व्या क्रमांकावर आहेत.

वनडे क्रमवारी -वनडेच्या ताज्या फलंदाजी ( Latest ODI batting rankings ) क्रमवारीत विराट कोहली दुसऱ्या आणि रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रमवारीत विराट कोहलीने आपले दुसरे स्थान कायम राखले असूनही रोहित फलंदाजांमध्ये एका क्रमांकाने घसरुन चौथ्या स्थानावर आला आहे. कोहलीचे 811 गुण आहेत आणि तो पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या मागे आहे, ज्याने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. मात्र, याआधी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रोहितला दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने चौथ्या क्रमांकावर ढकलले. एकदिवसीय गोलंदाजांच्या यादीत अव्वल 10 मधील एकमेव भारतीय बुमराह सहाव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर अष्टपैलूच्या क्रमवारीत रविंद्र जडेजा झिम्बाब्वेच्या सीन विल्यम्ससह 10 व्या स्थानावर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details