महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ODI World Cup 2023 Match Schedule : आयसीसीने एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक केले जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद

ICC ने एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा भारताच्या यजमानपदी ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा होणार आहे.

ODI World Cup 2023 Match Schedule
ICC ने एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक केले जाहीर

By

Published : Jun 27, 2023, 2:03 PM IST

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवार 27 जून रोजी पुरुषांच्या एकदिवसीय विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. 5 ऑक्टोबरपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार असून तिचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. ही स्पर्धा भारताच्या यजमानपदी खेळवली जाणार आहे. या शानदार सामन्याची सुरुवात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. यापूर्वी बोर्डाकडे पाठवलेल्या प्रारूप वेळापत्रकात कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. 15 ऑक्टोबरला भारतीय संघ अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.

एकूण 9 सामने खेळणार : या विश्वचषकात भारत साखळी फेरीत एकूण 9 सामने खेळणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ ८ ऑक्टोबरला चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. भारताचा दुसरा सामना ११ ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरुद्ध दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 15 ऑक्टोबरला भारत पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाचा चौथा सामना बांगलादेशविरुद्ध १९ ऑक्टोबरला पुण्यात होणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाचवा सामना 22 ऑक्टोबर रोजी धर्मशाला मैदानावर होणार आहे. भारताचा सहावा सामना 29 ऑक्टोबरला लखनौमध्ये इंग्लंडविरुद्ध होणार आहे. भारताचा क्वालिफायर २ नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. याशिवाय 5 नोव्हेंबरला कोलकाता येथे भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी भारत बंगळुरू येथे क्वालिफायर 1 खेळणार आहे.

भारत सामन्याचे वेळापत्रक : एकदिवसीय विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला मुंबईत तर दुसरा सामना दुसऱ्या दिवशी कोलकाता येथे होणार आहे. दोन्ही उपांत्य फेरीत राखीव दिवस असेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. तर 20 नोव्हेंबर हा राखीव दिवस असेल. तीनही बाद फेरीचे सामने दिवस-रात्रीचे असतील. यजमान भारत 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे पाच वेळा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. विश्वचषक स्पर्धेत दहा संघ सहभागी होतील, त्यापैकी आठ संघ पात्र ठरले आहेत आणि उर्वरित दोन झिम्बाब्वे येथे सुरू असलेल्या पात्रता स्पर्धेद्वारे पोहोचतील. पाकिस्तानचा सामना 20 ऑक्टोबरला बेंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी मुंबईत इंग्लंडची दक्षिण आफ्रिकेशी मुकाबला होणार आहे. धर्मशाला येथे 22 ऑक्टोबर रोजी भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने होतील.

10 संघ विश्वचषक खेळणार आहेत : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत. यासाठी 8 संघ आधीच पात्र ठरले आहेत. आता क्वालिफायर सामना झिम्बाब्वेमध्ये फक्त दोन ठिकाणी खेळवला जात आहे. या क्वालिफायर फेरीच्या सुपर सिक्समध्ये आतापर्यंत 6 संघ पोहोचले आहेत. या 6 संघांपैकी 2 संघ भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या मुख्य फेरीत सहभागी होणार आहेत. त्याचवेळी, सुरुवातीला दोन वेळा विश्वचषक विजेता वेस्ट इंडिज संघ या स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. यासोबतच श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात मुख्य फेरीत खेळण्याची शक्यता अधिक आहे. 9 जुलै रोजी, उर्वरित दोन संघ एकदिवसीय विश्वचषकात सामील होणार आहेत याचाही निर्णय होईल.

हेही वाचा :

  1. India Tour Of West Indies : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा ; पुजाराला डच्चू, अजिंक्य रहाणे उपकर्णधा
  2. Premier Handball League : महाराष्ट्र आयर्नमनने जिंकली पहिली प्रीमियर हँडबॉल लीग स्पर्धा, अंतिम सामन्यात गोल्डन ईगल्स युपीचा पराभव केला
  3. ICC Cricket World Cup 2023: क्रिकेट विश्वचषक 2023ची मुंबईत घोषणा, 10 ठिकाणी होणार 48 सामने

ABOUT THE AUTHOR

...view details