महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ICC ODI rankings: आयसीसी महिला वनडे क्रमवारी जाहीर ; मिताली राज आणि स्मृती मंधानाची दोन स्थानांनी घसरण - स्मृती मंधाना लेटेस्ट अपडेट्स

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या महिला वनडे क्रमवारी ( ICC Women's ODI Rankings ) मध्ये मिताली राज आणि स्मृती मंधाना यांची दोन स्थानांनी घसरण झाली आहे.

Mithali Raj
Mithali Raj

By

Published : Mar 8, 2022, 10:14 PM IST

दुबई :आयसीसीने मंगळवारी महिला खेळाडूंची ताजी वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यामध्ये काही बदल झाले आहेत. भारतीय संघाची कर्णधार मिताली राज ( Indian captain Mithali Raj ) आणि स्मृती मंधाना यांची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. या दोघी अनुक्रमे चौथ्या आणि दहाव्या स्थानावर पोहोचल्या आहेत.

महिला विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात मितालीला पाकिस्तानविरुद्ध केवळ नऊ धावा करता आल्या होत्या. त्याचबरोबर मंधानाने 75 चेंडूत 52 धावा केल्या होत्या. तसेच भारताच्या स्नेह राणा (नाबाद 53) आणि पूजा वस्त्राकर (67 धावा) यांनी अर्धशतके झळकावली होती. तसेच भारताने पाकिस्तानवर 107 धावांनी विजय ( India beat Pakistan by 107 runs ) नोंदवला होता.

वस्त्राकर 64 व्या क्रमांकावर ( Vastrakar at 64th position ) आहे. तर राणा पहिल्या 100मध्ये नाही. गोलंदाजांमध्ये झुलन गोस्वामी चौथ्या स्थानावर आहे तर अष्टपैलू दीप्ती शर्मा अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे.

विश्वचषकाच्या पहिल्या पाच सामन्यांनंतर क्रमवारीत बरेच चढ-उतार झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगने फलंदाजांच्या क्रमवारीत दोन स्थानांनी प्रगती केली आहे. ती अव्वल मानांकित अॅलिसा हिलीपेक्षा केवळ 15 रेटिंग गुणांनी मागे आहे.

फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलूंच्या क्रमवारीत वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूजही ( Haley Mathews of West Indies ) पुढे आली आहे. अव्वल पाचमध्ये पोहोचून ती अष्टपैलूंच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. तसेच ती फलंदाजांच्या क्रमवारीत 12 स्थानांनी वर येत 20 व्या स्थानावर पोहोचली आहे आणि गोलंदाजांमध्ये तीन स्थानांनी 10 व्या स्थानावर पोहोचली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details