महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ICC ODI Rankings: आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मितालीचे 'राज'

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वलस्थान काबीज केले आहे.

ICC ODI Rankings: mithali raj-reclaims-number-one-spot-in-icc-odi-rankings
ICC ODI Rankings: mithali raj-reclaims-number-one-spot-in-icc-odi-rankings

By

Published : Jul 6, 2021, 7:32 PM IST

दुबई - भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत गरुड झेप घेतली आहे. मितालीने क्रमवारीत अव्वलस्थान काबीज केले आहे. २२ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मिताली आठव्यांदा अव्वलस्थानी विराजमान झाली.

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यात नुकतीच तीन एकदिवसीय सामन्याची मालिका पार पडली. इंग्लंड संघाने या मालिकेत २-१ ने विजय मिळवला. परंतु या मालिकेतील तिन्ही सामन्यात मिताली राजने सलग तीन अर्धशतक झळकावली. तिने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ७२ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या सामन्यात तिने ५९ धावा चोपल्या. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात तिने नाबाद ७५ धावांची खेळी करत संघाला क्लिन स्विपच्या नामुष्कीपासून वाचवले. तिला या कामगिरीचा फायदा क्रमवारीत झाल्याचे पाहायला मिळाले. ती पहिल्या स्थानावर विराजमान झाली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी मिताली राज आठव्या क्रमांकावर होती. परंतु सर्वाधिक २०६ धावा करताना तिने क्रमवारीत थेट अव्वलस्थान गाठले. फेब्रुवारी २०१८ नंतर ती प्रथमच अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. एप्रिल २००५ मध्ये ती सर्वात प्रथम अव्वलस्थानी पोहोचली होती. दुसरीकडे भारताची युवा सलामीवीर शेफाली वर्मा ७१व्या क्रमांकावरून ४९व्या स्थानी आली आहे. स्मृती मंधाना या यादीत ९व्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत झूलन गोस्वामी पाचव्या स्थानावर आहे. तर पूनम यादव ९व्या स्थानी आहे.

विश्वविक्रमी मिताली राज

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात दोन विश्वविक्रमांना गवसणी घातली. तिने या सामन्यात नाबाद ७५ धावांची खेळी साकारत भारतीय महिला क्रिकेट संघाला विजय मिळवून दिला. यासह ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला फलंदाज बनली. तसेच मिताली सर्वाधिक एकदिवसीय सामने जिंकणारी महिला कर्णधार ठरली आहे.

हेही वाचा -IPL २०२२ Mega Auction : CSK 'या' ४ खेळाडूंना करू शकते रिटेन; सुरेश रैनाचा होणार पत्ता कट?

हेही वाचा -Big Braking! पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेआधी इंग्लंड ताफ्यातील ७ सदस्यांना कोरोनाची लागण

ABOUT THE AUTHOR

...view details