दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मॅच फिक्सिंग प्रकरणात यूएईच्या दोन खेळाडूंचे आठ वर्षांसाठी निलंबन केले आहे. निलंबन करण्यात आलेल्या खेळाडूंची नावे आमिर हयात आणि अशफाक अहमद अशी आहेत. त्यांच्यावर भारतीय सट्टेबाजांसोबत मिळून टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रता फेरीतील सामने फिक्स केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी ते दोघेही दोषी ठरले, त्यामुळे आयसीसीने ही कारवाई केली.
IND Vs ENG : शुबमनच्या दुखापतीविषयी अपडेट, जाणून घ्या किती काळ गिलला संघाबाहेर रहावे लागणार
आमिर हयात आणि अशफाक अहमद याचा जन्म पाकिस्तानात झाला आहे. ते यूएईकडून खेळत होते. त्यांच्यावर १३ सष्टेंबर २०२० रोजी मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यादिवसांपासून त्याची शिक्षा लागू करण्यात आली आहे. या दोघांनी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने फिक्स करण्यासाठी भारतीय सट्टेबाजांकडून जवळपास ४०८३ डॉलरची रक्कम घेतली.