मुंबई -आयसीसीने आगामी टी-20 विश्व करंडक स्पर्धेसाठी प्रत्येक देशाला 15 खेळाडू आणि आठ अधिकाऱ्यांना सोबत आणण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, ही स्पर्धा भारतात होणार होती. परंतु भारतातील कोरोनाची स्थिती पाहता या स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं आहे. भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितलं की, आयसीसीने टी-20 स्पर्धेत भाग घेणाऱ्या देशांना प्रत्येकी 15 खेळाडू आणि प्रशिक्षक इतर स्टाफ मिळून 8 जण यांना परवानगी दिली आहे. त्यांनी याची यादी 10 सप्टेंबरपर्यंत पाठवण्यास सांगितलं आहे. पीटीआयशी बोलताना त्या अधिकाऱ्याने सांगितलं की, आयसीसीने कोरोना आणि बायो बबलची परिस्थिती पाहून हा निर्णय घेतला आहे. आयसीसी फक्त 15 खेळाडू आणि 8 अधिकाऱ्यांचा खर्च उचलणार आहे.
अधिकाऱ्याने सांगितलं की, बोर्डाचा निर्णय आहे की कोरोना स्थिती पाहता त्यांनी मुख्य संघासोबत किती खेळाडू पाठवले पाहिजे. जर मुख्य संघातील कोणता खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला किंवा दुखापतग्रस्त झाला तर त्याची जागा राखीव खेळाडू घेऊ शकतो.