मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या ( Indian Premier League ) हंगामातील 41 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals ) संघात खेळला गेला. या सामन्यात कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना कोलकाताला 147 धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग करताना, रोव्हमॅन पॉवेलच्या नाबाद 33 धावांच्या जोरावर दिल्लीने 4 विकेट्सने सामना जिंकला. यानंतर आता वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू इयान बिशप यांनी रोव्हमॅन पॉवेलची मनाला स्पर्श करणारा एक किस्सा सांगितला आहे.
वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज इयान बिशपने दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज रोव्हमन पॉवेलचे ( Batsman Rowman Powell ) कौतुक करताना, पॉवेलची हृदयद्रावक कहानी सांगितली आहे. जेव्हा रोव्हमॅन पॉवेल माध्यमिक शाळेत होता, तेव्हा त्याने आपल्या आईला गरिबीतून बाहेर काढण्याचे वचन दिले होते.
इयान बिशपने ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले की, 'जर कोणाकडे 10 मिनिटे वेळ असेल, तर जा आणि रोव्हमन पॉवेलची जीवनकथा ( Biography of Rowman Powell ) पहा, ज्याचा व्हिडिओ यूट्यूबवर आहे. पॉवेलने आयपीएलमध्ये यशाची चव चाखल्यामुळे माझ्यासह अनेकांना आनंद का झाला हे तुम्हाला दिसेल. तो गरीब कुटुंबातून येतो. जेव्हा तो माध्यमिक शाळेत होता. तेव्हा त्याने त्याच्या आईला वचन दिले होते की, तो त्यांना गरिबीतून बाहेर काढेल. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. अप्रतिम कथा.'