केपटाउन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना मंगळवारी खेळला जाणार आहे. तत्पुर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे. कारण भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली या सामन्यात पुनरागन ( Skipper Virat Kohli's comeback ) करणार आहे. याबाबत स्वत: विराट कोहलीने माहिती दिली आहे.
INDvSA 3rd Test : तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली सज्ज ; मोहम्मद सिराजची माघार - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा सामना
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी तिसऱ्या ( INDvSA 3rd Test ) सामन्यापूर्वी विराट कोहली दुखापतीमधून सावरला आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा दुखातीमुळे ( Mohammed Siraj out due to injury ) तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.
विराट कोहली भारतीय संघाच्या सराव सत्राला उपस्थित होता. त्याने सराव फलंदाजी देखील केली. या अगोदर दुसऱ्या कसोटी सामन्यातून विराट कोहलीने पाठीच्या दुखापतीने माघार घेतली होती. तिसऱ्या कसोटी सामन्यापुर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विराट कोहली (Information of Virat Kohli at the press conference) म्हणाला, मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. तसेच जोहान्सबर्ग येथे भारताचा सात विकेट्सनी पराभव झाला होता, तेव्हा सिराजला दुखापत (Mohammed Siraj injured) झाल्याने तो खेळताना दिसणार नाही.
मंगळवार पासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ शानदार पुनरागमन करुन मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. भारतीय संघाने पहिला कसोटी सामना 113 धावांनी जिंकून मालिकेला शानदार सुरुवात केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने जोरदार पुनरागमन करत 7 विकेट्सने सामना जिंकला, त्यामुळे मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. तिसरा सामना आता निर्णायक असणार आहे