महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs SA 2nd T20 Tickets : भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याच्या तिकिटांसाठी प्रचंड गोंधळ; पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी-20 ( India vs South Africa T20 match ) सामन्याचे तिकीट मिळविण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी गोंधळ घातला. बारबती स्टेडियमवर 40 हजार लोकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

IND vs SA
IND vs SA

By

Published : Jun 10, 2022, 5:07 PM IST

कटक: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका ( IND vs SA T20 Series )खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी दिल्लीत पार पडला आणि या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर आता 12 जून रोजी होणार्‍या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या तिकिटांच्या विक्रीदरम्यान गुरुवारी बाराबती स्टेडियमवर गोंधळ उडाला. क्रिकेटप्रेमींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ते म्हणाले की, काही महिला मधूनच रांगेत पुढे आल्याने तिकीट विक्रीवरून गोंधळ निर्माण ( Huge ruckus for tickets ) झाला. त्यानंतर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. सध्या या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल ( Huge ruckus for tickets Viral Video ) होत आहे.

अतिरिक्त जिल्हा पोलिस आयुक्त प्रमोद रथ ( Additional District Commissioner Police Pramod Rath ) म्हणाले, काउंटरवर सुमारे 40,000 लोक उपस्थित होते. तर 12,000 तिकिटे विक्रीसाठी होती. यावेळी तिकीट विक्रीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा सात विकेट्सने पराभव ( SA Beat India by 7 wickets ) केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 19.1 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

हेही वाचा -Ipl Latest News : आयपीएलच्या सामन्यांची संख्या वाढणार, जाणून घ्या काय आहे बीसीसीआयचा नवा प्लॅन

ABOUT THE AUTHOR

...view details