होबार्ट : इंग्लंडचा कर्णधार जो रूटने (England Test captain Joe Root) आयपीएलच्या मेगा लिलावात (Joe Root withdraws from IPL ) न जाता आपल्या फॉर्मात नसलेल्या कसोटी संघाची कामगिरी सुधारण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावण्याचे ठरवले आहे. 2018 च्या लिलावात त्याला बोली न लागल्यामुळे रूटने कोणताही आयपीएल हंगाम खेळला नाही. गेल्या आठवड्यात त्याने सांगितले होते, की तो मेगा लिलावात सामील होण्याचा विचार करत आहे. त्याच्या कसोटी कारकिर्दीवर परिणाम होणार नसेल तरच आपण आयपीएल (Indian Premier League) खेळणार असल्याचेही त्याने सांगितले होते.
IPL mega auction:आयपीएलच्या मेगा लिलावात जो रुट सहभागी होणार नाही; जाणून घ्या काय आहे कारण - आयपीएल मेगा ऑक्शन
२०२१ च्या अॅशेस मालिकेमध्ये इंग्लंडच्या संघाला ऑस्ट्रेलियाकडून ४-० अशा फरकाने पराभव स्विकारावा लागला होतो. या मालिकेच्या निकालामुळे जो रूटचे आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये ( (IPL mega auction) सहभागी होण्याचे स्वप्न हे स्वप्नचं राहिले.
अॅशेस मालिकेतील पाचव्या सामन्यातील पराभवानंतर पत्रकार परिषदेत तो म्हणाला, या संघाला खूप सुधारणा करण्याची गरज आहे. यासाठी माझी सर्व शक्ती लावेन. माझ्यासाठी कसोटी क्रिकेट सर्वोपरि आहे आणि त्यासाठी मी सर्वकाही त्याग करू शकतो. त्याने आयपीएल लिलावात (IPL mega auction) सहभागी होण्याची ऑफर नाकारल्याची (Root out of IPL ) पुष्टी केली. या हंगामापासून आयपीएलमध्ये दहा संघ असणार आहेत. तसेच मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे.
हेही वाचा:Virat Kohli Step Down :कोहलीला कर्णधारपद गमावण्याची भीती होती, म्हणून त्याने राजीनामा दिला: संजय मांजरेकर यांचे वक्तव्य