महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मोठी बातमी! मुंबई इंडियन्सची धुरा हार्दिकच्या खांद्यावर, रोहितच्या १० वर्षांच्या कारकिर्दीला विराम - mi captain 2024

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians Captain) शुक्रवारी अष्टपैलू हार्दिक पांड्याला आयपीएल २०२४ साठी कर्णधार म्हणून घोषित (MI Captain २०२४) केलं. संघानं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याची घोषणा केली.

Hardik Pandya
Hardik Pandya

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 6:05 PM IST

Updated : Dec 15, 2023, 6:48 PM IST

मुंबई Hardik Pandya :आयपीएल लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians Captain) मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईनं शुक्रवारी अष्टपैलू हार्दिक पांड्याला इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या हंगामासाठी कर्णधार म्हणून घोषित (MI Captain २०२४) केलं. आता हार्दिक रोहित शर्माच्या जागी संघाचं नेतृत्व करेल.

गुजरातला पहिल्या हंगामात चॅम्पियन बनवलं होतं : हार्दिकनं यापूर्वी गुजरात टायटन्सचं नेतृत्व केलंय. त्यानं संघाला दोनदा अंतिम फेरीत नेलं. त्याच्या नेतृत्वात गुजरातचा संघ २०२२ मध्ये आपल्या पहिल्या हंगामातच चॅम्पियन बनला. तर २०२३ मध्ये गुजरात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध फायनल हरला होता.हार्दिक पांड्या गेल्या महिन्यात गुजरातमधून मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला होता. मुंबईनं त्याला ट्रेडच्या माध्यमातून आपल्या संघात शामील केलं. गुजरातमध्ये जाण्यापूर्वी तो मुंबई इंडियन्सचाच भाग होता. मुंबईकडून त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.

भविष्याचा विचार करून हा निर्णय घेतला : मुंबई इंडियन्सनं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याची घोषणा केली. संघाचे ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स महेला जयवर्धने यांनी सांगितलं की, आम्ही भविष्याचा विचार करून हा निर्णय घेतला आणि रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याची कर्णधारपदी नियुक्ती केली. रोहित शर्मानं १५८ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं. ज्यामध्ये संघानं ८७ सामने जिंकले, तर ६७ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ४ सामने बरोबरीत सुटले.

रोहित १० वर्ष कर्णधार होता : रोहित शर्मा तब्बल १० वर्ष मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. त्यानं पाच वेळा संघाला चॅम्पियन बनवलं आहे. रोहित शर्मा जेव्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला तेव्हा हा संघ एकदाही आयपीएल जिंकू शकला नव्हता. मात्र हिटमॅन कर्णधार होताच संघाचा कायापालट झाला. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईनं २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये विजेतेपद पटकावलं. यासह आयपीएलमध्ये आपल्या संघाला ५ वेळा चॅम्पियन बनवणारा रोहित शर्मा पहिला कर्णधार ठरला.

हे वाचलंत का :

  1. महेंद्रसिंह धोनीची '७' नंबरची जर्सी निवृत्त, यापुढे कोणत्याही भारतीय खेळाडूच्या पाठीवर दिसणार नाही ७ नंबर
  2. अंडर १९ वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, जाणून घ्या कोण आहे कर्णधार
  3. अबब! बीसीसीआयकडे किती ही संपत्ती, इतर देश आसपासही नाहीत; जाणून घ्या टॉप १० लिस्ट
Last Updated : Dec 15, 2023, 6:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details