मुंबईHardik Pandya : गुजरात टायटन्सनं अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला आयपीएल २०२४ च्या हंगामापूर्वी संघात कायम ठेवलं आहे. मुंबई इंडियन्स हार्दिकला ट्रेड करून आपल्या संघात आणेल, असा दावा यापूर्वी केला जात होता. मात्र आता या दाव्यांना पूर्णविराम मिळाला आहे.
गुजरातनं हार्दिकला कायम ठेवलं :रविवारी हार्दिक पांड्याला ट्रेड केलं जाईल, की गुजरात टायटन्स संघ त्याला कायम ठेवेल या बातमीची प्रत्येकजण आतुरतेनं वाट पाहत होता. गुजरातनं संध्याकाळी ५.३० वाजता रिटेन-रिलीझ खेळाडूंची यादी जाहीर केली. यामध्ये हार्दिक पांड्याचं नाव रिटेन केलेल्या खेळाडूंच्या यादीत होतं. विशेष म्हणजे, हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातनं आपल्या पहिल्या आयपीएल हंगामातच विजेतेपद पटकावलं होतं.
रिटेन आणि रिलीज केलेले खेळाडू : हार्दिक व्यतिरिक्त गुजरात टायटन्सनं मोहम्मद शमी, शुभमन गिल, राशिद खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, जोशुआ लिटल आणि मोहित शर्मा यांना संघात कायम ठेवलंय. तर गुजरातनं यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ आणि दासून शनाका या खेळाडूंना सोडलं आहे.
मुंबई इंडियन्समध्ये जाण्याच्या बातम्या : टीम इंडियाचा स्टार ऑलआउंडर हार्दिक पंड्याबद्दल यापूर्वी दावा केला जात होता की, तो आयपीएल २०२४ मध्ये गुजरात टायटन्सऐवजी मुंबई इंडियन्सकडून खेळेल. तो गुजरातमध्ये जाण्यापूर्वी मुंबईच्याच टीममध्ये होता. यासह, आगामी मोसमात हार्दिक गुजरातचं कर्णधारपद सांभाळणार असल्याचंही स्पष्ट झालं. तो मुंबई संघात गेला असता तर त्याला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळावं लागलं असतं. आयपीएलची 'ट्रेडिंग विंडो' आज म्हणजेच २६ नोव्हेंबर रोजी बंद झाली.
हेही वाचा :
- आयपीएलमध्ये 'हार्दिक'ची घरवापसी? मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये 'बिग डील'