हैदराबाद Hardik Pandya in Mumbai Indians : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा लिलाव (IPL २०२४ Auction) 19 डिसेंबरला दुबईत होणार आहे. या लिलावापूर्वी एक मोठी बातमी (IPL Auction) समोर येत आहे. गुजरात टायटन्सचा सध्याचा कर्णधार हार्दिक पांड्या (IPL २०२४ Auction Date) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा भाग होण्याची शक्यता आहे. हार्दिकनं (Hardik Pandya IPL) 2015 मध्ये मुंबई इंडियन्समधून (Mumbai Indians Players २०२४) आपल्या आयपीएल करिअरला सुरुवात केली होती.
हार्दिकसाठी मुंबई इंडियन्स किती पैसा करणार खर्च :हार्दिक पांड्याचं ट्रेडिंग पूर्णपणे रोख रकमेनं असेल. यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ गुजरात टायटन्सला 15 कोटी रुपये देईल. जर हा करार यशस्वी झाला तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी ट्रेडिंग असेल. मात्र या दोन्ही फ्रँचायझींनी अद्याप याबाबत कोणतंही अधिकृत विधान केलेलं नाही.
मुंबईकडे किती रक्कम शिल्लक : आयपीएल 2023 च्या लिलावानंतर, मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये फक्त 0.05 कोटी रुपये शिल्लक होते. फ्रँचायझीला आगामी लिलावासाठी अतिरिक्त 5 कोटी रुपये मिळतील. म्हणजेच मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याचा समावेश करण्यासाठी काही खेळाडूंना सोडू शकतं. खेळाडूंच्या नोंदणीची अंतिम मुदत 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता संपणार आहे. त्यानंतर हे स्पष्ट होईल.